News Flash

भारत किंवा इंग्लंड विश्वचषक जिंकेल – मॅकग्रा

आगामी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत भारत आणि इंग्लंड हे विजेतेपद जिंकू शकतील.

| March 22, 2019 03:39 am

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा

चेन्नई : आगामी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत भारत आणि इंग्लंड हे विजेतेपद जिंकू शकतील. गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला जेतेपदावर नाव कोरता येईल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने व्यक्त केले आहे.

भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने विश्वचषकातील विजेतेपदाच्या आशा उंचावल्या आहेत, असे ४९ वर्षीय मॅकग्राने सांगितले.

‘‘इंग्लंड आणि भारत हे विश्वचषकातील दोन सर्वोत्तम संघ आहेत. वेस्ट इंडिजमध्ये इंग्लंडला झगडायला लागले, तर भारताने ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करली. त्यामुळे या दोन संघांमधील रंगत अधिक वाढेल,’’ असे मॅकग्रा म्हणाला.

‘‘इशांत शर्मा हा अतिशय अनुभवी गोलंदाज आहे. अनुभवी भुवनेश्वर कुमारनेही अप्रतिम गोलंदाजी करायला हवी. मोहम्मद शमी सध्या सातत्याने बळी मिळवत आहे. जसप्रीत बुमराकडे असामान्य गुणवत्ता असू यॉर्कर्स आणि रीव्हर्स स्विंग करण्याची क्षमताही आहे. त्यामुळे भारताला विश्वविजेतेपदासाठी गोलंदाजांनी कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे,’’ असे मॅकग्राने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 3:39 am

Web Title: india or england will win the world cup says glenn mcgrath
Next Stories
1 जर्मनीची सर्बियाशी १-१ अशी बरोबरी
2 मियामी खुली  टेनिस स्पर्धा : प्रज्ञेशची मुख्य फेरीत धडक
3 माजी अव्वल बॅडमिंटनपटू पेरसोनवर दीड वर्ष बंदी
Just Now!
X