प्रारंभीचे दोन सामने जिंकूनदेखील चायनीज तैपेईकडून पराभव

हॉँगकॉँग : आशिया मिश्र सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने चायनीज तैपेईला जबरदस्त टक्कर दिली. मात्र अखेरीस २-३ अशा फरकाने पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे.

भारताची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू अश्मिता चलिहा आणि पुरुष दुहेरीतील जोडी अरुण जॉर्ज व सन्याम शुक्ला यांनी त्यांचे प्रारंभीचे सामने जिंकून घेत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यात अश्मिताने पहिला सामना

२१-१८, १७-२१, २१-१९ असा जिंकला, तर पुरुष दुहेरीत अरुण आणि सन्याम यांनी त्यांचा सामना २१-१७, १७-२१, २१-१४ असा जिंकला. त्यामुळे भारत तैपेईवर मात करणार अशीच चिन्हे होती. मात्र त्यानंतरच्या तिन्ही सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंवर तैपेईचे बॅडमिंटनपटू वरचढ ठरले. वॅँग झू वेईने सौरभ वर्माला २१-७, १६-२१, २३-२१ असे नमवले, तर त्यानंतरच्या महिलांच्या दुहेरीत शिखा गौतम आणि आरती सारा तर मिश्र दुहेरीत आरती सारा आणि रुतपर्णा पांडा यांना दोनच गेममध्ये तैपेईच्या खेळाडूंनी भारताला नमवले.