पीसीबी सूत्रांची माहिती; भारत सरकार कडून परवानगीची शक्यता
भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील मालिका श्रीलंकेत होणार असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळातील (पीसीबी) सूत्रांनी दिली आहे. ही मालिका २४ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालाधवीमध्ये होणार असून यासाठी भारतीय सरकारकडून हिरवा कंदिल या आठवडय़ात मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
पाकिस्तानात जाऊन खेळणार नसल्याचे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या संघाला भारतातील काही राज्यांमध्ये विरोध आहे. त्यामुळे ही मालिका श्रीलंकेत खेळवण्याचा सुवर्णमध्य काढण्यात आला आहे. ही मालिका जास्त कालावधीची खेळवण्यात येणार नसून यामध्ये कसोटी सामन्यांचा समावेश नसेल.
‘‘दोन्ही देशांमधील वातावरण पाहता ही मालिका श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांचे आगामी दौरे पाहता ही मालिका श्रीलंकेत खेळवणे योग्य ठरेल,’’ असे पीसीबीमधील सूत्रांनी सांगितले आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर ६ किंवा ७ जानेवारीला रवाना होणार आहे. तर पाकिस्तानचा संघ ७ जानेवारीला न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.

मालिके चे स्वरुप कोय असेल
या मालिके त तीन एक दिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० मालिका खेळवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यामध्ये कोही अंशी बदल होण्याची शक्यता असून एक दिवसीय सामन्यांची संख्या तीनऐवजी दोनवर येऊ शक ते. पण ही मालिको कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळवण्यासाठी पीसीबीने कंबर क सली आहे.
* सरावासाठी आठवडा हवा – वकोर
भारताविरुद्धच्या मलिके च्या तयारीसाठी आम्हाला एको आठवडय़ाचा कोलावधी पुरेसा आहे. यासाठी श्रीलंके मध्ये सराव शिबिराचे आयोजन क रण्यात यावे, अशी मागणी पाकि स्तानचे मुख्य प्रशिक्षक वकोर युनूस यांनी केली आहे.
* ठिकोणाबरोबर हवामानाचीही चाचपणी
या कोलावधीमध्ये श्रीलंके त वरु णराजा हजेरी लावत असतो. त्यामुळे या मालिके त पावसाचा खोडा पडू नये म्हणून पीसीबीचे पथक हवामानाचा अंदाज घेऊ न सामन्यांच्या ठिकोणांची चाचपणी क रणार आहे.