News Flash

हो, सिडनीत भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी शेरेबाजी झाली, क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून शिक्कामोर्तब

काय म्हटलं आहे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अहवालात...

हो, सिडनीत भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी शेरेबाजी झाली, क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून शिक्कामोर्तब

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरील प्रेक्षकांच्या वर्तनाचा अहवाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) सोपवला आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील भारत-ऑस्ट्रेलियामधील तिसरा कसोटी सिडनीत SCG वर झाला होता. सिडनीत टीम इंडियाच्या खेळाडूंवर वर्णद्वेषी शेरेबाजी झाली, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अहवालात म्हटले आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी वर्णद्वेषी शेरेबाजीचा केल्याचा, जो आरोप केला होता, त्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अहवालातून शिक्कामोर्तब केलं आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि अन्य भारतीय खेळाडूंवर कसोटीच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी स्टँडमधील प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी शेरेबाजी झाली होती. मैदानावरच सिराजने हा प्रकार कर्णधार अजिंक्य रहाणेच्या लक्षात आणून दिला होता. टीम इंडियाने याची अधिकृत तक्रार देखील केली होती.

आणखी वाचा- ऑस्ट्रेलियावरुन परतल्यानंतर ऋषभ पंत एमएस धोनीच्या भेटीला, फोटो झाला व्हायरल

मैदानावरील पंचांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना मैदान सोडण्याचा देखील पर्याय दिला होता. पण कर्णधार अजिंक्य रहाणेने खेळाचा आदर करत, सामना पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेज, तिकीट डाटा आणि प्रेक्षकांची चौकशी सुरु आहे. पण या वर्णद्वेषी शेरेबाजीला जबाबदार असणारे प्रेक्षक अजूनही सापडलेले नाहीत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या प्रेक्षकांवर स्टेडियम प्रवेशबंदीची कारवाई करण्यात येऊ शकते तसेच पोलिसांकडे सुद्धा हे प्रकरण सोपवले जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2021 11:23 am

Web Title: india players were subjected to racial abuse confirms cricket australia dmp 82
Next Stories
1 पुन्हा विराट कर्णधार अन् तू उपकर्णधार!; पत्रकाराच्या प्रश्नावर अजिंक्य रहाणेनं दिलं ‘हे’ उत्तर
2 ICC World Test Championship: अंतिम सामना पुढे ढकलला; नव्या तारखा जाहीर
3 IND vs ENG: कसोटी मालिकेआधी दिग्गज क्रिकेटपटूचा इंग्लंडच्या फिरकीपटूंना इशारा
Just Now!
X