आगामी २०२३ पुरुष हॉकी विश्वचषकासाच्या यजमानपदासाठी भारतही आता शर्यतीत उतरला आहे. जानेवारी १३ ते १९ दरम्यान हॉकी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे, यासाठी हॉकी इंडियाने आपली दावेदारी सादर केली आहे. याआधी ३ वेळा भारताने हॉकी विश्वचषकाचं यजमानपद भूषवलं आहे. भारताव्यतिरीक्त बेल्जियम आणि मलेशिया हे दोन देशही यजमानपदाच्या शर्यतीत आहेत.

महिला हॉकी विश्वचषकासाठी आतापर्यंत ५ देशांनी आपली दावेदारी सादर केल्याचं आंतरराष्ट्रीय हॉकी परिषदेने जाहीर केलंय. जर्मनी, स्पेन, नेदरलँड, मलेशिया आणि न्यूझीलंड हे ५ देश हॉकी विश्वचषकाच्या यजमानपदाच्या शर्यतीत आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी परिषदेची एक समिती ६ नोव्हेंबरला आतापर्यंत आलेल्या सर्व अर्जांना विचार करण्यासाठी भेटणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी याविषयी अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकाचं यजमानपद भारताला मिळतं का हे पहावं लागणार आहे.