इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या पॅरा आशियाई खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 33 कांस्य पदकांसह भारताने 72 पदकं आपल्या खिशात घातली आहेत. या कामगिरीसह पदक तालिकेत भारत नवव्या स्थानावर राहिला आहे. चीनने 318 पदकांसह पहिला क्रमांक मिळवला असून दुसऱ्या स्थानावर दक्षिण कोरिया तर तिसऱ्या स्थानावर इराणने बाजी मारली आहे. 2010 साली भारताच्या खात्यात फक्त 14 पदकं आली होती, तर 2014 साली भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीत सुधारणा करत पदकांची संख्या 33 वर नेली.

स्पर्धेच्या अंतिम दिवशी, भारताच्या प्रमोद भगतने बॅडमिंटन एकेरी प्रकारात इंडोनेशियाच्या उकुन रुकेंडीचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. याव्यतिरीक्त तरुण या खेळाडूने चीनच्या खेळाडूवर मात करत बॅडमिंटन SL4 प्रकारात आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारताने तिरंदाजी, बॅडमिंटन, सायकलिंग, पॉवरलिफ्टींग, जलतरण, टेबल टेनिस प्रकारात पदकांची कमाई केली.

अवश्य वाचा – Youth Olympics : भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची ‘रौप्य’कमाई