News Flash

भारताचे प्रो हॉकी लीगचे सामने लांबणीवर

भारतीय हॉकी संघ सध्या प्रो हॉकी लीगच्या गुणतालिकेत १५ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

| May 5, 2021 03:16 am

(संग्रहित छायाचित्र)

लुसान : आशियाई देशांमध्ये करोनाचा कहर वाढू लागल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासावर बरेच निर्बंध आले आहेत. त्यामुळेच भारतीय हॉकी संघाचे प्रो हॉकी लीगमधील स्पेन आणि जर्मनीविरुद्धच्या लढती लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

भारतीय पुरुष हॉकी संघ स्पेनविरुद्ध १५ आणि १६ मे रोजी तर जर्मनीविरुद्ध २३ आणि २४ मे रोजी सामने खेळणार होता. ‘‘आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (एफआयएच) तसेच भारत, स्पेन, जर्मनी आणि ग्रेट ब्रिटनच्या संघटनांनी हे सामने पुढे ढकलण्याच्या निर्णयावर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे या लढतीनंतर आयोजित केल्या जातील,’’ असे ‘एफआयएच’च्या पत्रकात म्हटले आहे.

‘‘सध्या भारतात करोनामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. भारतीय लोकांची हॉकीशी नाळ घट्ट जुळली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत आहोत,’’ असेही या पत्रकात म्हटले आहे. गेल्या महिन्यात भारताच्या ग्रेट ब्रिटनविरुद्ध ८ आणि ९ मे रोजी होणाऱ्या लढती पुढे ढकलण्यात आल्या होत्या. भारतीय हॉकी संघ सध्या प्रो हॉकी लीगच्या गुणतालिकेत १५ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 3:16 am

Web Title: india s pro hockey league matches postponed zws 70
Next Stories
1 चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल माद्रिद-चेल्सी यांच्यात अंतिम फेरीसाठी चढाओढ
2 परदेशी खेळाडूंच्या परतीसाठी मार्ग काढू -ब्रिजेश पटेल
3 IPL २०२१चं आयोजन सप्टेंबर महिन्यात होणार? अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांचे सूतोवाच!
Just Now!
X