10 July 2020

News Flash

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याचे संकेत

वर्षाअखेरीस टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

नवीन वर्षात ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-२० विश्वचषक हे भारतीय संघासमोरचं प्रमुख आव्हान असणार आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियातच वन-डे आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी थांबणार आहे. या दौऱ्यात भारत परदेशातला आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआयमधील सुत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.

२०१९ वर्षात भारतीय संघाने कोलकात्यात इडन गार्डन्स मैदानावर बांगलादेशविरुद्ध पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला होता. हा सामना भारताने जिंकत इतिहासाची नोंद केली होती. मात्र ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर गुलाबी चेंडूवर खेळणं हे नेहमी आव्हानात्मक असतं. याबबतीत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरीही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काही काळात याबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो. याप्रकरणी बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चाही झाल्याचं समजतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 5:09 pm

Web Title: india set to play day night test in australia says reports psd 91
Next Stories
1 U-19 WC : …भारताला दाखवून द्यायचं होतं ! बीभत्स सेलिब्रेशन करणाऱ्या बांगलादेशी गोलंदाजाची कबुली
2 IPL 2020 : एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण हंगामाचं वेळापत्रक
3 Ind vs NZ : गरज पडल्यास सलामीला येण्यास तयार – हनुमा विहारी
Just Now!
X