पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी करण्यासाठी भारतीय क्रीडा संघटनांनी अन्य देशांच्या संघटनांचा आदर्श घ्यावा, अशी सूचना भारताचे क्रीडा मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केली आहे.
‘‘अन्य देशांमधील क्रीडा संघटनांचा आदर्श जोपासला, तरच ऑलिम्पिकमध्ये १५ पदके जिंकता येतील,’’ अस सोनोवाल यांनी गुरुवारी विविध क्रीडा संघटनांच्या झालेल्या बैठकीमध्ये सांगितले.
‘‘रिओ ऑलिम्पिकमध्ये अधिकाधिक पदके जिंकण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. परंतु किमान दहा पदके निश्चितपणे मिळू शकतील,’’ असे सोनोवाल यांनी सांगितले.