नवे वर्ष हे क्रीडाचाहत्यांसाठी मेजवानीचे असणार आहे. गेल्या वर्षांत भारतीय खेळाडूंची चांगली कामगिरी पाहायला मिळाली, पण पुढील वर्षांत नव्या आशेसह, उमेदीने हे खेळाडू उतरतील आणि पुन्हा एकदा देशाची मान अभिमानाने उंचावतील. सरत्या वर्षांप्रमाणे येणारे २०१८ वर्षही क्रिकेटच्या भरगच्च कार्यक्रमाचे असेल. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी कसलाच तोटा नसणार आहे; पण अन्य क्रीडाप्रेमींसाठी विशेषत: फुटबॉल, हॉकी आणि मैदानी स्पर्धावर भरभरून प्रेम करण्यासाठी येणारे वर्ष जल्लोषमय आहे. जगात सर्वाधिक खेळला जाणारा आणि सर्वाधिक प्रेक्षकसंख्या लाभलेल्या फुटबॉल या खेळाचा विश्वचषक यंदा होणार आहे. तत्पूर्वी, मैदानी स्पर्धकांनी (अ‍ॅथलेटिक्स) चार वष्रे घेतलेल्या मेहनतीची कसोटी पाहणारी राष्ट्रकुल स्पर्धाही होणार आहे.

महिला व पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघांच्या कामगिरीची उत्सुकता नक्कीच असेल. त्यात पुरुष विश्वचषक स्पर्धा भारतात होत असल्याने हॉकीप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचणे साहजिकच आहे. यासह ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कबड्डी आदी खेळ आहेतच अधूनमधून क्रीडाप्रेमींचे मनोरंजन करायला. २०१८ मधील काही प्रमुख स्पर्धाच्या वेळापत्रकाबाबत जाणून घेऊ या.

टेनिस

  • ऑस्ट्रेलिया खुली : १५ ते २८ जानेवारी
  • फ्रेंच खुली : २७ मे ते १० जून
  • विम्बल्डन : २ ते १५ जुलै
  • अमेरिकन खुली :
  • २७ ऑगस्ट ते १० सप्टेंबर

फुटबॉल

  • विश्वचषक स्पर्धा : १४ जून ते १५ जुलै; रशिया
  • २० वर्षांखालील महिला विश्वचषक : ७ ते २६ ऑगस्ट; फ्रान्स
  • १७ वर्षांखालील महिला विश्वचषक : १३ नोव्हेंबर ते १ डिसेंबर; उरुग्वे
  • क्लब विश्वचषक : १२ ते २२ डिसेंबर; संयुक्त अरब अमिराती

हॉकी

  • सुलतान अझलन शाह चषक : ३ ते ११ मार्च; मलेशिया
  • आशियाई महिला चॅम्पियन्स करंडक : १३ ते २० मे; कोरिया
  • पुरुष चॅम्पियन्स करंडक : २३ जून ते १ जुलै; नेदरलँड्स
  • महिला विश्वचषक : २१ जुलै ते ५ ऑगस्ट; लंडन
  • पुरुष आशियाई चॅम्पियन्स करंडक : १ ते १५ ऑक्टोबर
  • पुरुष विश्वचषक : २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर; भारत

तिरंदाजी इन्डोअर

  • विश्वचषक (तिसरी फेरी) : १९ ते २१ जानेवारी; फ्रान्स
  • विश्वचषक (अंतिम फेरी) : ९ ते ११ फेब्रुवारी; अमेरिका
  • जागतिक अजिंक्यपद : १४ ते १९ फेब्रुवारी; अमेरिका

आऊटडोअर

  • विश्वचषक (पहिली फेरी) : २४ ते २९ एप्रिल; चीन
  • विश्वचषक (दुसरी फेरी) : २१ ते २६ मे; टर्की
  • विश्वचषक (तिसरी फेरी) : १९ ते २४ जून;अमेरिका
  • विश्वचषक (अंतिम फेरी) : १७ ते २२ जुलै; जर्मनी
  • जागतिक अजिंक्यपद : ४ ते ९ सप्टेंबर; इटली

बॅडमिंटन

  • आशिया अजिंक्यपद : २४ ते २९ एप्रिल; चीन
  • थॉमस अ‍ॅण्ड ऊबेर चषक : २० ते २७ मे; थायलंड
  • बीडब्लूएफ जागतिक अजिंक्यपद : ३० जुलै ते ५ ऑगस्ट; चीन
  • आशिया कनिष्ठ अजिंक्यपद : १४ ते २२ जुलै; इंडोनेशिया
  • जागतिक विद्यापीठ अजिंक्यपद : १५ ते २१ ऑक्टोबर; मलेशिया
  • बीडब्लूएफ जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद : ५ ते १८ नोव्हेंबर; कॅनडा

मैदानी स्पर्धा

  • जागतिक इन्डोअर अजिंक्यपद : २ ते ४ मार्च; लंडन
  • जागतिक अर्ध मॅरेथॉन अजिंक्यपद : २४ मार्च; स्पेन
  • जागतिक २० वर्षांखालील अजिंक्यपद : १० ते १५ जुलै; फिनलँड
  • आशियाई क्रीडा स्पर्धा : १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर; इंडोनेशिया
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : ४ ते १५ एप्रिल; ऑस्ट्रेलिया

बॉक्सिंग

  • जागतिक विद्यापीठ अजिंक्यपद : १७ ते २६ एप्रिल; इटली
  • जागतिक अजिंक्यपद : नोव्हेंबर (तारिख ठरलेली नाही); भारत
  • युवा जागतिक अजिंक्यपद (पुरुष) : सप्टेंबर (ठिकाण व तारिख ठरलेली नाही)
  • आशियाई युवा अजिंक्यपद : (वेळापत्रक ठरलेले नाही); थायलंड

बुद्धिबळ

  • कँडिडेट्स : १० ते २८ मार्च; बर्लिन
  • आशियाई युवा : १ ते १० एप्रिल; थायलंड
  • जागतिक हौशी अजिंक्यपद : २१ ते ३० एप्रिल; इटली
  • जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद (२० वर्षांखालील मुली) : ४ ते १६ सप्टेंबर; टर्की
  • जागतिक अजिंक्यपद : ९ ते २८ नोव्हेंबर; लंडन
  • जागतिक वरिष्ठ अजिंक्यपद : १७ ते ३० नोव्हेंबर; स्लोव्हेनिया

क्रिकेट

  • दक्षिण आफ्रिका दौरा : ५ जानेवारी ते २५ फेब्रुवारी
  • युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक : १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी
  • इंग्लंड दौरा : १ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर
  • आशिया चषक : भारत (तारिख ठरलेली नाही)
  • वेस्ट इंडिज दौरा : ऑक्टोबर ते नाव्हेंबर