विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांची अक्षरशः दाणादाण उडाली, ज्यामुळे कांगारुंना विजयासाठी ९० धावांचं सोपं आव्हान मिळालं. ३६ धावा करत कसोटी क्रिकेटमध्ये भारताने आपली निच्चांकी धावसंख्या नोंदवली. भारतीय संघाच्या या खराब कामगिरीनंतर सोशल मीडियावर चाहते चांगलेच नाराज झाले आहेत.

अवश्य वाचा – भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने उडवली खिल्ली, म्हणाला…

भारताच्या या पराभवावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचं कौतुक करताना आफ्रिदीने भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करु शकतो परंतू कोहलीशिवाय ही गोष्ट कठीण असेल असं म्हटलंय.

पहिला सामना संपल्यानंतर विराट कोहली भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचं नेतृत्व येईल. २६ डिसेंबरपासून भारतीय संघ आपला दुसरा कसोटी सामना खेळेल. पृथ्वी शॉचा खराब फॉर्म, मोहम्मद शमीचं दुखापतीमुळे संघाबाहेर जाणं यामुळे अंतिम ११ जणांचा संघ निवडताना भारतीय संघ व्यवस्थापनासमोर मोठा पेच असणार आहे.

अवश्य वाचा – दुसऱ्या कसोटीसाठी लोकेश राहुलला भारतीय संघात स्थान मिळायला हवं – मोहम्मद कैफ