आगामी वेस्ट इंडीच दौऱ्यासाठी शुक्रवारी होणारी भारतीय संघाची निवड एका दिवस पुढे ढकलण्यात आली असून शनिवारी संघाची निवड होणार आहे. हा निर्णय सीओए आणि बीसीसीआय यांच्यातील नव्या निर्णयावरून झालेल्या वादामुळे घेण्यात आला आहे. सीओएने गुरूवारी आपला निर्णय देत म्हटले आहे की, निवड समितीच्या बैठकीत बोर्ड सचिव सहभागी होणार नाहीत आणि संपूर्ण जबाबदारी निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के.प्रसाद यांची असणार आहे.

याप्रकरणी संबंधीत एका सुत्राकडून माहिती मिळाली की, सीओएच्या निर्णयामुळे ठरलेल्या धोरणामध्ये बदलासाठी मजबूर केले गेले आहे. त्यामुळेच संघ निवड एक दिवस पुढे ढकलली आहे. सीओएच्या निर्णयामुळे काही अडचणी वाढल्या आहेत. ज्या सोडवणे आवश्यक आहे.

प्रशासकीय समितीने सांगितले आहे की, बीसीसीआयची नवी घटना आल्यानंतर सचिव निवड समितीच्या बैठकीचे संयोजक असत, निवड समितीला कोणत्याही प्रकारच्या मंजूरीसाठी सचिवांना मेल करावा लागत होता. अशाप्रकारे निवड समितीला देखील दौऱ्यासाठी सचिवांच्या मंजूरीची लागत होती. मात्र आता निवड समितीला कोणत्याही प्रकारच्या बदलासाठी सचिव किंवा सीईओकडून कोणत्याही प्रकारच्या मंजूरीची आवश्यता असणार नाही.