03 April 2020

News Flash

टोकियो ऑलिम्पिकआधी हॉकी इंडियाला उपरती, FIH Pro League मध्ये सहभागी होण्याचा निर्णय

भारताचा सलामीचा सामना नेदरलँडविरुद्ध

२०२० साली जपानच्या टोकियो शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेआधी हॉकी इंडियाने आपल्या रणनितीमध्ये मोठा बदल केला आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी संघाच्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या FIH Pro League स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार आहे. १८ जानेवारी २०२० पासून भारताच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना नेदरलँडविरुद्ध होणार आहे. यानंतर भारतीय संघ ८-९ फेब्रुवारीदरम्यान विश्वविजेत्या बेल्जियम संघाशी घरच्या मैदानावर दोन हात करणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी खेळणाऱ्या सर्वोत्तम संघांना या महत्वाच्या स्पर्धेत सहभाग मिळतो. पहिल्या वर्षी भारतीय संघाने या स्पर्धेतून माघार घेतली होती.

भारतीय हॉकी संघाचं FIH Pro League स्पर्धेचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

२०२० टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय संघ अद्याप पात्र झालेला नाहीये, यासाठी भारताला ऑलिम्पिक पात्रता फेरीत खेळावं लागणार आहे. मात्र ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम संघांचा असणारा सहभाग लक्षात घेता भारताने Pro League स्पर्धेत खेळणं महत्वाचं असल्याचं मत, भारताने प्रशिक्षक ग्रॅहम रिड यांनी व्यक्त केलं होतं. “आगामी वर्षात Pro League स्पर्धेत खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. सर्वोत्तम संघांविरोधात खेळणं हे भारतीय खेळाडूंसाठी गरजेचं आहे. या स्पर्धेतून आगामी ऑलिम्पिकसाठी खेळाडू किती तयार आहेत हे लक्षात येईल”, रिड यांनी आपली प्रतिक्रीया दिली. भारताचा कर्णधार मनप्रीत सिंहने या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 7:07 pm

Web Title: india to open campaign against netherlands in fih pro league psd 91
टॅग Hockey India
Next Stories
1 विंडीज दौऱ्यात ऋषभ पंतचा पराक्रम, धोनीलाही टाकलं मागे
2 मोहम्मद शमीवर इतक्यात कारवाई नाही – BCCI
3 BCCI शमीच्या वकिलांशी चर्चा करणार, संघातलं स्थान धोक्यात ?
Just Now!
X