News Flash

भारतात जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा

भारतीय सायकलिंग क्षेत्रास सुगीचे दिवस आले आहेत. जागतिक स्तरावरील स्पर्धाच्या मालिकेतील नॉर्दन एक्सप्रेस स्पर्धा मनाली येथे ५ ते १३ जुलै या कालावधीत होणार आहे.

| May 21, 2014 12:58 pm

भारतीय सायकलिंग क्षेत्रास सुगीचे दिवस आले आहेत. जागतिक स्तरावरील स्पर्धाच्या मालिकेतील नॉर्दन एक्सप्रेस स्पर्धा मनाली येथे ५ ते १३ जुलै या कालावधीत होणार आहे.
मनाली ते खारदुंगला या मार्गावर ही स्पर्धा होत असून त्यामध्ये जर्मनी, इटली, बेल्जियम, नेदरलँड, अमेरिका आदी देशांमधील खेळाडू भाग घेणार आहेत. बर्फाळ डोंगर, रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी, अधूनमधून कडेला असलेल्या खोल दऱ्या व अतिशय निसर्गरम्य प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मार्गातील ही स्पर्धा परदेशी खेळाडूंप्रमाणेच सायकलिंगच्या चाहत्यांसाठी आकर्षण ठरणार आहे. या मार्गात यापूर्वी आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती. ५२० किलोमीटर अंतराची ही स्पर्धा असून त्यामध्ये अठरा वर्षांवरील खेळाडूंना भाग घेण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा तीन विभागांमध्ये होईल.
पहिल्या विभागात मनाली ते खारदुंगला हे अंतर सात टप्प्यांमध्ये पार करावे लागणार आहे. त्यामध्ये वेग, वेळ व सायकलिंग कौशल्य याची कसोटीच ठरणार आहे.
दुसऱ्या विभागात खेळाडूंना मनाली ते जिस्पा (हिमाचल प्रदेश) ही दोन दिवसांची स्पर्धा पार करावी लागणार आहे. तिसऱ्या विभागात केवळ हौशी खेळाडूंना शर्यतीचा आनंद घेण्याची संधी मिळेल, मात्र या विभागात कोणतीही शर्यत राहणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 12:58 pm

Web Title: india to organise international cycling championship in july
Next Stories
1 कबड्डीला अच्छे दिन आए है..
2 स्वित्र्झलड (इ-गट) – आहे नैपुण्य तरी..!
3 ‘प्रो-कबड्डी’ लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडू खेळणार
Just Now!
X