News Flash

आशियाई खेळांसाठी ५२४ खेळाडूंच्या पथकाला ऑलिम्पिक संघटनेची मान्यता

भारतीय फुटबॉल संघाला मात्र मान्यता नाही

२०१४ च्या तुलनेत यंदा पथकामध्ये कपात

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने इंडोनेशियातील जकार्ता येथे होणाऱ्या आशियाई खेळांसाठी ५२४ खेळाडूंच्या भारतीय पथकाला आपली मान्यता दिलेली आहे. १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान इंडोनेशियात भारतीय खेळाडू ३६ क्रीडाप्रकारांमध्ये पदकांच्या शर्यतीमध्ये उतरताना दिसतील. या पथकामध्ये २७७ पुरुष तर २४७ महिला खेळाडूंचा समावेश आहे. २०१४ साली झालेल्या आशियाई खेळांसाठी भारताने ५४१ जणांचं पथक पाठवलं होतं. त्या तुलनेमध्ये भारताने यंदा आपल्या पथकात कपात केल्याचं दिसून येतंय.

अवश्य वाचा – आशियाई खेळ : भारतीय वेटलिफ्टर्सची मदार मीराबाई चानूच्या खांद्यावर

यंदा ऑलिम्पिक संघटनेने नेहमीच्या क्रीडाप्रकारांसोबत ८ नवीन खेळांसाठीही भारतीय संघाला मान्यता दिलेली आहे. कराटे, रोलर स्केटिंग, सॉफ्ट टेनिस यांच्यासारख्या ८ नवीन प्रकारांमध्ये यंदा भारतीय खेळाडू आपलं नशिब आजमावताना दिसतील. ५२४ जणांच्या पथकापैकी ५२ पदकांची भारताला आशा आहे. भारतीय महिला व पुरुष फुटबॉल संघाला मात्र या आशियाई खेळांसाठी ऑलिम्पिक संघटनेने मान्यता दिलेली नाहीये.

अवश्य वाचा – फिफा तर सोडाच, भारतीय फुटबॉल संघ आशियाई खेळांसाठीही अपात्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 6:57 am

Web Title: india to send 524 athletes for asian games 2018
Next Stories
1 मुंबई रणजी प्रशिक्षकपदासाठी रमेश पोवारचा अर्ज
2 Wimbeldon 2018: सामना पहायला आलेल्या ‘त्या’ मुलीची अजब मागणी रॉजर फेडररने केली पूर्ण
3 भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामन्यात ७ विक्रमांची नोंद, धोनी-कोहलीच्या नावावर ‘हा’ विक्रम
Just Now!
X