News Flash

अहमदाबादेत उभं राहतंय जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान

इडन गार्डन्स, मेलबर्न च्या मैदानालाही टाकणार मागे

क्रिकेट हा खेळ भारतीय लोकांसाठी एका धर्माप्रमाणे आहे. याच क्रिकेटवेड्या भारतीय प्रेक्षकांसाठी अहमदाबाद शहरात जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान उभं राहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद मधील या मैदानाला सरदार पटेल यांचं नाव देण्यात आलं असून, आसनक्षमतेच्या बाबतीत हे मैदान कोलकात्याचं इडन गार्डन्स आणि मेलबर्न क्रिकेट क्लबच्या मैदानालाही मागे सोडणार आहे. या नवीन मैदानाती आसनक्षमता ही 1 लाख 10 हजारांच्या घरात असणार आहे. मेलबर्न क्रिकेट क्लबच्या मैदानाची आसनक्षमता सध्या 1 लाख आहे, तर कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानाची आसनक्षमता 80 हजारांच्या घरात आहे.

गुजरात क्रिकेट असोसिएशने उपाध्यक्ष परिमल नथवानी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या मैदानाच्या बांधकामाचे फोटो शेअर केले आहेत.

63 एकर जमिनीवर या मैदानाचं बांधकाम सुरु असून यासाठी अंदाजे 700 कोटींचा खर्च येणार आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीला या मैदानाचं कंत्राट मिळालेलं आहे. 1982 साली बांधण्यात आलेलं हे मैदान गुजरात क्रिकेट असोसिएशनने 2015 साली संपूर्णपणे तोडून पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला. सुसज्ज ड्रेसिंग रुम, स्विमींग पूल आणि अनेक अत्याधुनिक सोयी-सुवीधा या मैदानात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 9:48 am

Web Title: india to soon be home to the worlds largest cricket stadium
Next Stories
1 ऋषभ पंतचं भविष्य उज्वल – सौरव गांगुली
2 ‘जीएसटी’ कपातीनंतरही क्रीडासाहित्याची विक्री मंदावली
3 देशातील युवा बुद्धिबळपटूंमध्ये अफाट गुणवत्ता -आनंद
Just Now!
X