News Flash

बुमराह-नटरानमधील हा अजब योगायोग; तुम्हाला माहितेय?

सेहवागने सांगितलेला योगायोग पाहून तुम्हीही नक्कीच विचार कराल...

कॅनबेरा येथे शुक्रवारी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ११ धावांनी पराभव केला. पदार्पण करणारा डावखुरा गोलंदाज नटराजन यानं या सामन्यात भारताकडून तीन विकेट घेतल्या. नटराजनचं दोन दिवसांपूच एकदिवसीय सामन्यात पदार्पण झालं होतं. यॉर्कर किंग म्हणून आयपीएलमध्ये ओळख झालेल्या नटराजनने पहिल्या एकदिवसीय सामन्यातही प्रभावी मारा केला होता. या सामन्यात नटराजनला दोन बळी मिळवण्यात यश आलं होतं. भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागनं नटराजन आणि जसप्रीत बुमराह यांच्यातील अजब योगायोग सांगितला आहे.

विरेंद्र सेहवागनं आपल्या इन्स्टाग्रम पोस्टमध्ये बुमराह आणि नटराजन या दोन वेगवान गोलंदाजचं फोटो पोस्ट करत एक अजब योगायोग सांगिताला आहे. सेहवागनं आकडेवारीच्या माध्यमातून या दोघांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत घडलेल्या काही सारख्या गोष्टी सांगितल्या आहेत. सेहवागने सांगितलेला योगायोग पाहून तुम्हीही नक्कीच विचार कराल…

“अशा प्रकारचे योगायोग पाहायला आवडते.”
बुमराह आणि नटराज यांच्याबाबतचेयोगायोग
– दोघांचीही भारतीय संघात बदली खेळाडू म्हणून निवड झाली.
– दोघांनीही ऑस्ट्रेलियामध्ये वनडे आणि टी२० सामन्यात पदार्पण केले.
-दोघांनीही मालिकेच्या शेवटच्या वनडे सामन्यातून पदार्पण केले.
– या दोघांनीही पदार्पण केलेल्या मालिकेत भारताने फक्त एक सामना जिंकला.
– दोघांनीही त्यांच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दोन बळी घेतले.
– दोघांनीही पहिल्या टी२० सामन्यात तीन बळी घेतले.

“बुमराह प्रभावी गोलंदाज आहे. जर नटराजननेही तशीच कामगीरी केली, तर भारताचा वेगवान मारा आधिक घातक ठरू शकेल.”

नटराजनने आपल्या गोलंदाजीनं सर्वांनाच प्रभावीत केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 9:32 am

Web Title: india tour of australia 2020 bumraj natraj virendra sehawag nck 90
Next Stories
1 युरोपा लीग फुटबॉल : टॉटनहॅम, एसी मिलान बाद फेरीत
2 करोनामुक्त नरसिंहचा विश्वचषक संघात समावेश
3 बॉक्सिंग निवडणुकीच्या रिंगणात आशीष शेलार!
Just Now!
X