एकदिवसीय सामन्याची मालिका गमावल्यानंतर भारतीय संघानं टी-२० मालिकेत विजय मिळवून सव्याज परतफेड केली आहे. भारतीय संघानं तीन सामन्याची टी-२० मालिका २-० नं खिशात घालती आहे. या मालिकेचं खास वैशिष्ट्य म्हणजे, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, शामी आणि भुनमेश्वरकुमार यासारखे दिग्गज खेळाडू नसतानाही भारतीय संघानं विजय मिळवला आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित मिळवलेल्या विजयावर विराट कोहलीनं प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा- पांड्याची फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाला आठवला धोनी

रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यासांरख्या प्रमुख खेळाडूंशिवाय खेळतानाही ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत टी-२० मालिकेत धूळ चारल्यामुळे मी आनंदित आहे, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीनं सामन्यानंतर सांगितलं. ” टी-२० मालिकेत संघ बांधणी योग्य प्रकारे जुळून आली आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांसारखे आमचे मर्यादित षटकांच्या सामन्यातील प्रमुख खेळाडू या मालिकेत संघाचा भाग नव्हते. तरीही ऑस्ट्रलियाला पराभूत केल्यामुळे मी समाधानी आहे, असं कोहली म्हणाला.’ हार्दिक आता एक परिपक्व खेळाडू म्हणून उद्यास आला आहे. त्यानं सामाना जिंकवूनच पॅव्हेलियनमध्ये परतावे, अशी अपेक्षा संघाला आहे. त्यामुळे ही खेळी त्याला स्वत:लाही सुखावणारी असेल, याची मला खात्री आहे. त्याशिवाय नटराजनच्या समावेशामुळे गोलंदाजांच्या फळीत विविधता निर्माण झाली आहे, असेही कोहलीनं सांगितलं.

आणखी वाचा- भारताच्या विजयावर रोहितची प्रतिक्रिया, म्हणाला…

दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांच्यात मैदानात मात देत भारताने दुसरा टी२० सामना जिंकला आणि मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. कर्णधार मॅथ्यू वेडच्या तुफानी ५८ धावा आणि त्याला स्टीव्ह स्मिथने (४६) दिलेली साथ यांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने १९४ धावांची धावसंख्या उभारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवनचं अर्धशतक (५२) आणि हार्दिक पांड्याच्या धडाकेबाज नाबाद ४२ धावांच्या जोरावर भारतीय संघाने सामना ६ गडी राखून जिंकला.