पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६२ चेडूत शतकी खेळी करणाऱ्या स्मिथनं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय गोलंदाजांची धुलाई केली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्मिथनं पुन्हा एकदा ६२ चेंडूत तुफानी शतक झळकावलं आहे. स्मिथनं भारतीय गोलंदाजाची धुलाई करतान दोन षटकार आणि १४ चौकार लगावत शतकी खेळी केली. स्मिथचं करिअरमधील हे अकरावं शतक आहे तर भारताविरोधात पाचवं शतक आहे. १२७ व्या एकदिवसीय सामन्यात स्मिथचं अकरावं शतक आहे.

स्मिथनं ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय सामन्यात तिसरं वेगवान शतक झळकावलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलनं सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे. मॅक्सवेलनं फक् ५१ चेंडूत शतकी खेळी केली होती. दुसऱ्या क्रमांकावर जेम्स फॉक्नर आहे. फॉकनरनं ५७ चेंडूत शतकी खेळी केली होती. स्मिथनं ६२ चेंडूत शतक झळकावलं आहे. स्मिथच्या एकदिवसीय करिअरमधील हे सर्वात वेगवान दुसरं शतक आहे.


स्मिथनं एकदिवसीय सामन्यात भारताविरोधात लागोपाठ पाचव्यांदा ५० पेक्षा जास्त धावांची खेळी केली. यामध्ये सलग तिसऱ्यांदा शतकी खेळी आहे.  हार्दिक पांड्यानं स्मिथला माघारी झाडलं. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्मिथ स्मिथनं ६४ चेंडूत १०४ धावांची खेळी केली.