महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधवने झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर 7 गडी राखून मात केली आहे. याचसोबत भारताने 3 वन-डे सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली आहे, कसोटी मालिकेपाठोपाठ भारताने वन-डे मालिकेतही बाजी मारत ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत केलं आहे. भारताचा ऑस्ट्रेलियातला हा पहिलाच वन-डे मालिका विजय ठरला आहे, त्यामुळे भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेंद्रसिंह धोनीने 87 तर केदार जाधवने 61 धावांची खेळी केली. या दोघांनीही चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून रिचर्डसन-सिडल आणि स्टॉयनिस यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. सामन्यात 6 बळी घेणाऱ्या युझवेंद्र चहलला सामनावीर तर दोन सामन्यात भारताच्या विजयात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं.

याआधी अखेरच्या सामन्यात संधी मिळालेल्या फिरकीपटू युझवेंद्र चहलने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या सामन्यात धडाकेबाज सुरुवात केली. ऑस्ट्रेलियालाला 230 धावांवर रोखण्यात भारतीय संघाला यश आलं. युझवेंद्र चहलने सामन्यात 5 बळी घेत भारताचं पारडं जड राखण्यात मोठी भूमिका बजावली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्विकारलेल्या भारतीय गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.

भुवनेश्वर कुमारने दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. यानंतर शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजा यांनी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियन संघाचा डाव सावरला. मात्र शॉन मार्श माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. युझवेंद्र चहलने ऑस्ट्रेलियाची मधली फळी आपल्या भेदक माऱ्याने कापून काढली. मधल्या फळीत पिटर हँडस्काँबने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत अर्धशतक झळकावलं. मात्र तो माघारी परतल्यानंतर इतर फलंदाज फारसा तग धरु शकले नाहीत. अखेरीस 230 धावांत ऑस्ट्रेलियाचा संघ गारद झाला. भारताकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक 6 बळी घेतले. त्याला भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने 2-2 बळी घेत चांगली साथ दिली.

Live Blog

Highlights

  • 14:30 (IST)

    अखेर भारताची जमलेली जोडी फुटली, कर्णधार विराट बाद

    रिचर्डसनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कॅरीने घेतला विराटचा झेल

  • 14:19 (IST)

    विराट-धोनीची महत्वाची भागीदारी, भारताचा डाव सावरला

    भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर धोनी आणि कोहलीने संघाचा डाव सावरला आहे. या दोघांमध्ये झालेल्या भागीदारीमुळे भारताने 100 धावसंख्येचा टप्पाही ओलांडला

  • 12:51 (IST)

    भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

    पिटर सिडलच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा झेलबाद

  • 11:49 (IST)

    शमीने उडवला बिली स्टॅनलेकचा त्रिफळा, ऑस्ट्रेलियाचा संघ 230 धावात गारद

    भारताला विजयासाठी 231 धावांचं आव्हान

  • 11:19 (IST)

    पिटर हँडस्काँबचं अर्धशतक, ऑस्ट्रेलियाची सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल

    महत्वाचे फलंदाज माघारी परतल्यानंतर हँडस्काँबने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक साजरं केलं आहे.

  • 10:03 (IST)

    त्याच षटकात उस्मान ख्वाजा माघारी, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

    एक धाव काढण्याच्या नादात उस्मान ख्वाजा चहलकडे सोपा झेल देऊन माघारी, कांगारुंचा चौथा गडी माघारी

  • 10:00 (IST)

    युझवेंद्र चहलने दूर केला शॉन मार्शचा अडसर, ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

    चहलच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याच्या नादात शॉन मार्श यष्टीचित. ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फुटली

  • 09:06 (IST)

    कांगारुंना दुसरा धक्का, फिंच माघारी

    उस्मान ख्वाजा-फिंच जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न, मात्र भुवनेश्वरने फिंचला पायचीत करुन माघारी धाडलं

  • 07:37 (IST)

    नाणेफेक जिंकून भारताची प्रथम गोलंदाजी

    भारताने निर्णायक सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकरली आहे. 

  • 07:31 (IST)

    पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर

    पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर होत आहे.

16:18 (IST)18 Jan 2019
विजयासाठी आवश्यक असलेली एक धाव चौकाराच्या रुपाने काढत भारत सामन्यात विजयी

केदार जाधवने चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने विजयी

16:18 (IST)18 Jan 2019
धोनीपाठोपाठ केदार जाधवचंही अर्धशतक

केदारनेही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतक साजरं केलं

15:08 (IST)18 Jan 2019
महेंद्रसिंह धोनीचं अर्धशतक, भारताचं आव्हान कायम

कोहली माघारी परतल्यानंतर धोनीने केदार जाधवला हाताशी धरत आपलं अर्धशतक साजरं केलं आहे. यामुळे सामन्यात भारताचं आव्हान अद्याप कायम राहिलं आहे

14:30 (IST)18 Jan 2019
अखेर भारताची जमलेली जोडी फुटली, कर्णधार विराट बाद

रिचर्डसनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कॅरीने घेतला विराटचा झेल

14:19 (IST)18 Jan 2019
विराट-धोनीची महत्वाची भागीदारी, भारताचा डाव सावरला

भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर धोनी आणि कोहलीने संघाचा डाव सावरला आहे. या दोघांमध्ये झालेल्या भागीदारीमुळे भारताने 100 धावसंख्येचा टप्पाही ओलांडला

13:31 (IST)18 Jan 2019
शिखर धवन माघारी, भारताला दुसरा धक्का

मार्कस स्टॉयनिसने पकडला धवनचा झेल

12:51 (IST)18 Jan 2019
भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

पिटर सिडलच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा झेलबाद

11:49 (IST)18 Jan 2019
शमीने उडवला बिली स्टॅनलेकचा त्रिफळा, ऑस्ट्रेलियाचा संघ 230 धावात गारद

भारताला विजयासाठी 231 धावांचं आव्हान

11:45 (IST)18 Jan 2019
चहलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात झॅम्पा माघारी

ऑस्ट्रेलियाचा नववा फलंदाज बाद, चहलच्या खात्यात सहावा बळी

11:38 (IST)18 Jan 2019
पिटर हँडस्काँब माघारी, ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का

युझवेंद्र चहलचे सामन्यात पाच बळी, भारताचं सामन्यावर वर्चस्व

11:28 (IST)18 Jan 2019
चहलचा ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का, रिचर्डसन माघारी

केदार जाधवने घेतला रिचर्डसनचा झेल, चहलचा सामन्यातला चौथा बळी

11:19 (IST)18 Jan 2019
पिटर हँडस्काँबचं अर्धशतक, ऑस्ट्रेलियाची सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल

महत्वाचे फलंदाज माघारी परतल्यानंतर हँडस्काँबने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक साजरं केलं आहे.

10:48 (IST)18 Jan 2019
शमीच्या गोलंदाजीवर मॅक्सवेल माघारी, ऑस्ट्रेलियाचा सहावा गडी बाद

फटकेबाजी करत मॅक्सवेल भारतीय गोलंदाजांपुढे आव्हान उभं करत होता, मात्र शमीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात मॅक्सवेल माघारी

10:28 (IST)18 Jan 2019
स्टॉयनिस माघारी, कांगारुंचा निम्मा संघ तंबूत परतला

चहलच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये रोहित शर्माने घेतला स्टॉयनिसचा सुरेख झेल

10:03 (IST)18 Jan 2019
त्याच षटकात उस्मान ख्वाजा माघारी, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

एक धाव काढण्याच्या नादात उस्मान ख्वाजा चहलकडे सोपा झेल देऊन माघारी, कांगारुंचा चौथा गडी माघारी

10:00 (IST)18 Jan 2019
युझवेंद्र चहलने दूर केला शॉन मार्शचा अडसर, ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

चहलच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याच्या नादात शॉन मार्श यष्टीचित. ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फुटली

09:59 (IST)18 Jan 2019
उस्मान ख्वाजा - शॉन मार्श जोडीने कांगारुंचा डाव सावरला

दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत संघाला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली

09:06 (IST)18 Jan 2019
कांगारुंना दुसरा धक्का, फिंच माघारी

उस्मान ख्वाजा-फिंच जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न, मात्र भुवनेश्वरने फिंचला पायचीत करुन माघारी धाडलं

08:35 (IST)18 Jan 2019
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, केरी माघारी

भुवनेश्वर कुमारने घेतला केरीचा बळी

08:27 (IST)18 Jan 2019
पावसाचा खेळ थांबला, सामन्याला सुरुवात

सामन्यावर पावसाचं सावट मात्र कायम

08:02 (IST)18 Jan 2019
सामन्यात पुन्हा एकदा पावसाचा व्यत्यय, पंचांनी सामना थांबवला

भुवनेश्वर कुमारने अवघा एक चेंडू टाकल्यानंतर सामन्यात पावसाचं पुनरागमन झाल्याने सामना थांबवण्यात आला आहे

07:44 (IST)18 Jan 2019
भारताच्या संघात ३ बदल

भारताच्या संघात ३ बदल करण्यात आले आहेत. मोहम्मद सिराज याच्या जागी अष्टपैलू विजय शंकरला संघात स्थान मिळाले आहे. अंबाती रायडूच्या जागी केदार जाधवला संघात घेण्यात आले आहे. तर कुलदीप यादवच्या जागी युझवेन्द्र चहलला संघात संधी देण्यात आली आहे.

07:37 (IST)18 Jan 2019
नाणेफेक जिंकून भारताची प्रथम गोलंदाजी

भारताने निर्णायक सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकरली आहे. 

07:31 (IST)18 Jan 2019
पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर

पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर होत आहे.

07:31 (IST)18 Jan 2019
विजय शंकरला संधी

३ सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर दुसरा सामना भारताने जिंकला. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात विजय शंकर याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India tour of australia 3rd odi melbourne live updates online
First published on: 18-01-2019 at 07:28 IST