भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद २४ धावा केल्या. त्याआधी भारताचा पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घोषित करण्यात आला. चेतेश्वर पुजारा (१९३) आणि ऋषभ पंत (१५९*) यांच्या दीडशतकी खेळाच्या जोरावर भारताने ही मजल मारली. या दोघांशिवाय मयंक अग्रवाल (७७) आणि रवींद्र जाडेजा (८१) यांनी अर्धशतकी खेळी केली. दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ५९८ धावांनी पिछाडीवर आहे.

पहिल्या दिवशी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी घेतली होती. पण भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली. संघात पुन्हा संधी मिळालेल्या लोकेश राहुलला अवघ्या ९ धावाच करता आल्या. जॉश हेजलवूडने त्याला माघारी पाठवले. नवोदित मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सावरला. त्यामुळे उपहारापर्यंत भारताने एका गड्याच्या मोबदल्यात ६९ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या सत्रात मयंक ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७७ धावा करून झेलबाद झाला. दुसऱ्या विकेटसाठी त्याने पुजारासोबत ११६ धावांची भागीदारी रचली. चेतेश्वर पुजाराने कर्णधार विराट कोहलीला हाताशी घेत डाव पुढे नेला. पुजाराने अर्धशतक पूर्ण करत चहापानापर्यंत भारताला २ गड्यांच्या मोबदल्यात १७७ धावांपर्यंत मजल मारून दिली. शेवटच्या सत्रात आधी कर्णधार कोहली २३ धावांवर आणि काही कालावधीने उपकर्णधार अजिंक्य रहाणे १८ धावांवर तंबूत परतला. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर भारताने ४ बाद ३०३ अशी भक्कम धावसंख्या उभारली होती.

त्यापुढे आज खेळाला सुरुवात झाली. पहिल्या सत्रात नॅथन लॉयनने विहारीचा बळी टिपला. त्याने ४२ धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने आपला फॉर्म कायम राखत दीडशतक लगावले, पण द्विशतकाने त्याला हुलकावणी दिली. तो १९३ धावांवर बाद झाला. ऋषभ पंतने नाबाद १५९ धावा केल्या. अखेर जाडेजा ८२ धावांवर बाद झाल्यानंतर भारताचा डाव घोषित करण्यात आला.

Live Blog

11:32 (IST)04 Jan 2019
जाडेजा त्रिफळाचित; ७ बाद ६२२ धावांवर भारताचा डाव घोषित

जाडेजा त्रिफळाचित; ७ बाद ६२२ धावांवर भारताचा डाव घोषित

11:28 (IST)04 Jan 2019
पंतचे वादळी दीडशतक; भारत भक्कम स्थितीत

पंतचे वादळी दीडशतक; भारत भक्कम स्थितीत

11:22 (IST)04 Jan 2019
पंत-जाडेजाची तुफान फटकेबाजी; भारत ६०० पार

पंत-जाडेजाची तुफान फटकेबाजी; भारत ६०० पार

11:16 (IST)04 Jan 2019
पंत-जाडेजाची तुफान फटकेबाजी; भारत ६०० पार

पंत-जाडेजाची तुफान फटकेबाजी; भारत ६०० पार

10:50 (IST)04 Jan 2019
रवींद्र जाडेजाचे अर्धशतक; भारत ५५० पार

अष्टपैलू रवींद्र जाडेजाने शानदार अर्धशतक ठोकले. यासह भारताची धावसंख्या ५५० पार गेली. जाडेजाने ८९ चेंडूत ५० धावा केल्या.

10:45 (IST)04 Jan 2019
ऋषभ पंतचं शतक, भारताची धावसंख्या ५०० पार

भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत याने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिले शतक ठोकले. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ५०० पार मजल मारली.

10:17 (IST)04 Jan 2019
ऋषभ पंतचं शतक, भारताची धावसंख्या ५०० पार

पंतचं कसोटी सामन्यातलं दुसरं शतक

09:53 (IST)04 Jan 2019
चहापानापर्यंत कांगारु बॅकफूटवर, पंतची शतकाच्या दिशेने वाटचाल

ऋषभ पंतने रविंद्र जाडेजाच्या मदतीने भागीदारी करत भारताच्या धावसंख्येत भर घातली. भारत ६ गड्यांच्या मोबदल्यात ४९१ धावा

08:36 (IST)04 Jan 2019
ऋषभ पंतचं झुंजार अर्धशतक

पंतने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्ला चढवत आपलं अर्धशतक साजरं केलं. त्याचं कसोटी सामन्यांमधलं हे तिसरं अर्धशतक ठरलं आहे.

08:28 (IST)04 Jan 2019
द्विशतकाच्या उंबरठ्यावर पुजारा माघारी, भारताला सहावा धक्का

नॅथन लॉयनने घेतला पुजाराचा बळी, पुजाराची १९३ धावांची खेळी

08:13 (IST)04 Jan 2019
भारताने ओलांडला ४०० धावांचा टप्पा

पहिल्या डावात भारताची बाजू अधिक भक्कम

07:11 (IST)04 Jan 2019
दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत भारत आणखी भक्कम स्थितीत

५ गड्यांच्या मोबदल्यात भारताच्या ३८९ धावा. चेतेश्वर पुजारा द्विशतकाच्या जवळ

05:58 (IST)04 Jan 2019
अखेर भारताची जोडी फुटली, हनुमा विहारी माघारी

नॅथन लॉयनने घेतले विहारीचा बळी. पुजारा-विहारीमध्ये शतकी भागीदारी. भारताचा निम्मा संघ माघारी

05:57 (IST)04 Jan 2019
चेतेश्वर पुजारा - हनुमा विहारी जोडीची सावध सुरुवात

दोन्ही फलंदाजांनी सावध खेळ करत धावफलक हलता ठेवला, यादरम्यान पुजाराने आपलं दीड शतक पूर्ण केलं.