News Flash

रोहितच्या शतकापुढे इंग्लंड निष्रभ, भारत ८ गडी राखून विजयी

भारत मालिकेत १-० ने आघाडीवर

रोहित शर्मा

सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात इंग्लंडवर ८ गडी राखून मात केली आहे. आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखत रोहितने या सामन्यातही शतकी खेळी केली. इंग्लंडच्या गोलंदाजीचा समाचार घेत रोहितने नाबाद १३७ धावा केल्या. इंग्लंड दौऱ्यातलं रोहितचं हे दुसरं शतकं ठरलं. विराट कोहलीसोबत रोहितने केलेल्या १६७ धावांच्या भागीदारीमुळे भारताने या सामन्यात आपलं वर्चस्व कायम राखलं. इंग्लंडने दिलेल्या २६९ या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी डावाची आक्रमक सुरुवात केली होती. मात्र शिखर धवन माघारी परतल्यानंतर रोहितने विराटच्या साथीने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेतली. दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत चौफेर फटकेबाजी केली. अखेर आदिल रशिदच्या गोलंदाजीवर विराट कोहली यष्टीचीत होऊन माघारी परतला. यानंतर रोहित शर्माने लोकेश राहुलच्या साथीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंडकडून आदिल रशिद आणि मोईन अली यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी कुलदीप यादवने घेतलेल्या सहा बळींच्या जोरावर भारताने पहिल्या सामन्यात इंग्लंडला २६८ धावांवर रोखलं. कुलदीपने पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या ६ फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला. नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताचा निर्णय पहिल्या सत्रात काहीसा उलडला. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्ट्रो या जोडीने पहिल्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. मात्र यानंतर कुलदीप यादवने इंग्लंडच्या संघाला भगदाड पाडलं. ३ बळी माघारी परतल्यानंतर बेन स्टोक्स आणि जोस बटलर जोडीने इंग्लंडचा डाव सावरत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. स्टोक्स आणि बटलर या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर इंग्लंडचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. यानंतर मोईन अली – आदिल रशीद जोडीने फटकेबाजी करत इंग्लंडला २५० धावांचा टप्पा ओलांडून दिला.

भारताकडून कुलदीप यादवने ६ बळी घेतले. त्याला उमेश यादवने २ तर युझवेंद्र चहलने १ बळी घेत चांगली साथ दिली.

लोकसत्ता समालोचन
Live Blog
Highlights
  • 20:18 (IST)

    डेव्हिड विली माघारी, इंग्लंडचा सातवा गडी माघारी

    कुलदीप यादवने त्याच षटकात डेव्हिड विलीला माघारी धाडत इंग्लंडला आणखी एक धक्का दिला आहे. कुलदीपचा या सामन्यातला हा सहावा बळी ठरला आहे.

  • 18:28 (IST)

    भारतीय फिरकीपटूंची कमाल सुरुच, चहलच्या गोलंदाजीवर मॉर्गन माघारी

    भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात इंग्लंडचे गोलंदाज एकापोठापाठ एक अडकत चालले आहेत. चांगल्या सुरुवातीनंतर कुलदीप यादवने इंग्लंडच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं. यानंतर चहलने इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनचा अडसर दूर केलाय. इंग्लंडचे ४ गडी माघारी

23:57 (IST)12 Jul 2018
रोहित - लोकेश राहुल जोडीकडून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब

लोकेश राहुलने विजयी धाव काढत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलंय. ३ सामन्यांच्या मालिकेत भारत १-० ने आघाडीवर

23:31 (IST)12 Jul 2018
भारताची जोडी फुटली, विराट कोहली माघारी

१६७ धावांच्या अभेद्य भागीदारीनंतर अखेर भारताची जमलेली जोडी फोडण्यात इंग्लंडला यश आलं आहे. आदिल रशिदच्या गोलंदाजीवर विराट कोहली यष्टीचीत होऊन माघारी परतला आहे. विराट कोहलीने ८२ चेंडूत ७५ धावांची खेळी करत रोहितला भक्कम साथ दिली.

23:19 (IST)12 Jul 2018
हिटमॅनचा तडाखा सुरुच, रोहित शर्माचं धडाकेबाज शतक

रोहित शर्माने धडाकेबाज शतकी खेळी करत पहिल्या सामन्यात भारताला विजयाच्या जवळ आणून ठेवलं आहे. रोहित शर्माचं वन-डे कारकिर्दीतलं १८ वं शतकं

22:54 (IST)12 Jul 2018
कर्णधार विराट कोहलीचंही अर्धशतक

रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीनेही आपलं अर्धशतक झळकावलं आहे.

22:44 (IST)12 Jul 2018
रोहित शर्माचं अर्धशतक, भारताचं सामन्यावर वर्चस्व कायम

शिखर धवन माघारी परतल्यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीच्या साथीने संघाचा डाव सावरत अर्धशतकी खेळी केली आहे. विराटच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करत रोहितने सामन्यावर भारताचं वर्चस्व कायम राखलं आहे.

21:52 (IST)12 Jul 2018
आक्रमक सुरुवातीनंतर भारताला पहिला धक्का, शिखर धवन माघारी

इंग्लंडने दिलेल्या २६९ धावांचा पाठलाग करताना भारताच्या रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने डावाची आक्रमक सुरुवात केली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे भारताने लवकरच ५० धावांचा टप्पा ओलांडला. मोईन अलीच्या गोलंदाजीवर राशिद अलीकडे झेल देत धवन माघारी.

20:45 (IST)12 Jul 2018
प्लंकेट धावबाद, इंग्लंडचा डाव २६८ धावांवर आटोपला. भारताला विजयासाठी २६९ धावांचं आव्हान

सुरेश रैनाच्या अचून फेकीवर प्लंकेट माघारी. इंग्लंडचा डाव २६८ धावांवर आटोपला, भारताला विजयासाठी २६९ धावांचं आव्हान

20:40 (IST)12 Jul 2018
आदिल रशिद माघारी, इंग्लंडचा नववा गडी माघारी

अखेरच्या षटकात उमेश यादवच्या गोलंदाजीवर आदिल रशिद माघारी. इंग्लंडची धावसंख्या २५० पार

20:32 (IST)12 Jul 2018
उमेश यादवच्या गोलंदाजीवर मोईन अली माघारी, इंग्लंडचा आठवा गडी माघारी

आदिल रशिद-मोईन अली जोडीने फटकेबाजी करुन संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र उमेश यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात मोईन अली बाद. कोहलीने पकडला झेल.

20:18 (IST)12 Jul 2018
डेव्हिड विली माघारी, इंग्लंडचा सातवा गडी माघारी

कुलदीप यादवने त्याच षटकात डेव्हिड विलीला माघारी धाडत इंग्लंडला आणखी एक धक्का दिला आहे. कुलदीपचा या सामन्यातला हा सहावा बळी ठरला आहे.

20:16 (IST)12 Jul 2018
अर्धशतकी खेळी करुन बेन स्टोक्स माघारी, इंग्लंडचा सहावा गडी माघारी

जोस बटलरपाठोपाठ बेन स्टोक्सनेही सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे. मात्र त्याचा हा आनंद फारकाळ टिकू शकला नाही. १०३ चेंडून ५० धावांची खेळी करणारा स्टोक्स कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर माघारी परतला आहे. सिद्धार्थ कौलने स्टोक्सचा झेल पकडला.

19:52 (IST)12 Jul 2018
इंग्लंडची जमलेली जोडी पुन्हा फुटली, कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर जोस बटलर माघारी

पाचव्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केल्यानंतर इंग्लंडची जमलेली जोडी फुटली आहे. कुलदीप यादवने जोस बटलरचा अडथळा दूर करत इंग्लंडला पाचवा धक्का दिला आहे. बटलरची ५१ चेंडूमध्ये ५ चौकारांसह ५३ धावांची खेळी.

19:45 (IST)12 Jul 2018
जोस बटलरचं संयमी अर्धशतक

जोस बटलरने भारताच्या गोलंदाजीचा नेटाने सामना करत अर्धशतक झळकावलं आहे. बेन स्टोक्ससोबतच्या या भागीदारीमुळे इंग्लंड सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.

19:21 (IST)12 Jul 2018
इंग्लंडचा डाव सावरला, बटलर-स्टोक्स जोडीची भागीदारी

४ बळी गेल्यानंतर जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांनी इंग्लंडच्या डावाला आकार दिला आहे. दोघांनीही पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली असून इंग्लंडने १५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. याच जोडीवर इंग्लंडची मदार अवलंबून असणार आहे.

18:28 (IST)12 Jul 2018
भारतीय फिरकीपटूंची कमाल सुरुच, चहलच्या गोलंदाजीवर मॉर्गन माघारी

भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात इंग्लंडचे गोलंदाज एकापोठापाठ एक अडकत चालले आहेत. चांगल्या सुरुवातीनंतर कुलदीप यादवने इंग्लंडच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं. यानंतर चहलने इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनचा अडसर दूर केलाय. इंग्लंडचे ४ गडी माघारी

18:04 (IST)12 Jul 2018
इंग्लंडची घसरगुंडी, जॉनी बेअरस्ट्रोही माघारी परतला

जो रुटला माघारी धाडल्यानंतर कुलदीपने लागोपाठ जॉनी बेअरस्ट्रोला माघारी धाडलं. भारताचं पायचीतचं अपील मैदानावरील पंचांनी फेटाळून लावलं. मात्र भारतीय खेळाडूंनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितल्यानंतर बेअरस्ट्रो बाद असल्याचं समोर आलं. इंग्लंडचे ३ गडी तंबूत

17:58 (IST)12 Jul 2018
इंग्लंडला दुसरा धक्का, जो रुट पायचीत होऊन माघारी

कुलदीप यादवने भारताला दुसरं यश मिळवून दिलं आहे. जो रुटला माघारी धाडत कुलदीपने इंग्लंडला दुसरा धक्का दिला आहे

17:51 (IST)12 Jul 2018
इंग्लंडला पहिला धक्का, जेसन रॉय माघारी

अखेर इंग्लंडची जमलेली जोडी कुलदीप यादवने फोडली. जेसन रॉय ३८ धावा काढून माघारी.

17:37 (IST)12 Jul 2018
इंग्लंडची सावध सुरुवात, जेसन रॉय - जॉनी बेअरस्ट्रो जोडीची फटकेबाजी

अॅलेक्स हेल्सच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या जॉनी बेअरस्ट्रोने संयमाने फलंदाजी करत आठव्या षटकात इंग्लंडला ५० धावांचा टप्पा गाठून दिला आहे.

16:46 (IST)12 Jul 2018
सिद्धार्थ कौलचं आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण

टी-२० मालिकेत केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर सिद्धार्थ कौलला आता वन-डे सामन्यातही संधी देण्यात आली आहे.

16:44 (IST)12 Jul 2018
भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

३ सामन्यांची टी-२० मालिका जिंकल्यानंतर आता वन-डे मालिका जिंकण्याचं आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. २०१९ च्या विश्वचषकाची रंगीत तालीम म्हणून या मालिकेकडे पाहिलं जात आहे.

टॅग : Ind Vs Eng
Next Stories
1 आयपीएलने क्रिकेटची वाट लावली, इंग्लंडच्या माजी खेळाडूची टीका
2 मला मूर्ख समजतोस का? जेव्हा कॅप्टन कूल धोनी कुलदीप यादववर भडकतो
3 मुंबईकर अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी, KKR अकादमीच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती
Just Now!
X