X

Ind vs Eng : अखेरच्या कसोटीत कूकच्या नावावर विक्रमांची नोंद, जाणून घ्या चौथ्या दिवसातले १० विक्रम

अखेरच्या कसोटीतही भारतावर पराभवाचं सावट

ओव्हलच्या मैदानात सुरु असलेल्या अखेरच्या कसोटीत भारतावर पुन्हा एकदा पराभवाचे काळे ढग जमायला लागले आहेत. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात भारताचे ३ गडी माघारी परतले आहेत. मात्र आपल्या कारकिर्दीचा अखेरचा कसोटी सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कूकने शतकी खेळी करुन अनेक विक्रमांची नोंद केली.

अवश्य वाचा – Ind vs Eng : भारत आणि कूकचे शतक… जाणून घ्या काय आहे योगायोग

१ – कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या डावखुऱ्या फलंदाजांच्या यादीत अॅलिस्टर कूक पहिल्या स्थानावर पोहचला आहे. कूकने श्रीलंकेच्या कुमार संगकाराला मागे टाकलं आहे.

३ – आपली अखेरची कसोटी खेळत असताना तिसऱ्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करणाऱ्यांच्या यादीत कूक-रुट जोडी तिसऱ्या स्थानावर.

अवश्य वाचा – Ind vs Eng : सचिन, पॉन्टींगला जमलं नाही, ते कूकने करून दाखवलं…

३ – मालिकेत सर्वाधिक धावा करुनही पराभव स्विकारावा लागणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अनुक्रमे पहिल्या व तिसऱ्या स्थानावर. २०१४-१५ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहलीने ६९२ धावा केल्या होत्या, तर यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात विराटने ५९३ धावा केल्या आहेत.

४ – कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकी भागीदाऱ्या करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अॅलिस्टर कूक चौथ्या स्थानावर.

५ – पदार्पणाच्या आणि अखेरच्या कसोटीत शतक झळकावणारा अॅलिस्टर कूक पाचवा फलंदाज ठरला आहे.

२ – ८ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊन सॅम कुरनने या मालिकेत २७२ धावा केल्या आहेत. कुरनने केलेली ही कामगिरी दुसऱ्या स्थानावर राहिली आहे. २०१० साली न्यूझीलंडने केलेल्या भारत दौऱ्यात हरभजन सिंहने आठव्या क्रमांकावर येत ३१५ धावा पटकावल्या होत्या.

१३ – अॅलिस्टर कूकच्या निवृत्तीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार करणारे सर्व १३ फलंदाज निवृत्त झाले आहेत. या यादीमध्ये आता हाशिम आमला ९०२२ धावांसह १४ व्या स्थानावर आहे.

१३ – दुसऱ्या डावात सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम करत अॅलिस्टर कूक निवृत्त. या यादीमध्ये इतर फलंदाज पुढीलप्रमाणे

१४ – एका कसोटी मालिकेत सर्वाधिक झेल घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत लोकेश राहुलने राहुल द्रविडला मागे टाकलं आहे.

३८२ – कारकिर्दीची पहिल्या आणि अखेरच्या कसोटीतील धावांची गोळाबेरीज करुन सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अॅलिस्टर कूक ३८२ धावांसह चौथ्या स्थानावर.

  • Tags: ind-vs-eng,