News Flash

भारताच्या ‘गब्बर’शेर कडून किवींची शिकार; मालिकेत 1-0 ने आघाडी

दुसऱ्या विकेटसाठी शिखर-विराटची निर्णायक भागीदारी

सलामीवीर शिखर धवनने दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार विराट कोहलीसोबत केलेल्या भागीदारीच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडवर 8 गडी राखून मात केली. विजयासाठी दिलेलं 156 आव्हान भारताने 2 गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. न्यूझीलंडला झटपट गुंडाळण्यात यशस्वी झाल्यानंतर, रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीवीरांच्या जोडीने भारतीय डावाची धडाक्यात सुरुवात केली.

मधल्या काही षटकांदरम्यान प्रखर सुर्यप्रकाराशामुळे सामना थांबवण्यात आला होता. यामुळे सामन्यातलं एक षटक कमी करुन भारताला विजयासाठी दिलेल्या आव्हानात एक धाव कमी करण्यात आली. दरम्यान चांगल्या सुरुवातीनंतर रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर शिखरने विराटच्या साथीने भारतीय डावाला आकार दिला. यादरम्यान शिखर धवनने अर्धशतकही झळकावलं, त्याने 75  धावा केल्या. विराट कोहलीनेही त्याला उत्तम साथ दिली, मात्र सामना जिंकायला अवघ्या काही धावा शिल्लक असताना तो झेलबाद होऊन माघारी परतला. त्याचं अर्धशतक 5 धावांनी हुकलं.

त्याआधी मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि अन्य भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडला 157 धावांवर रोखलं.  नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मार्टीन गप्टील आणि कॉलिन मुनरो शमीच्या गोलंदाजीवर माघारी परतले. यानंतर एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत असताना कर्णधार केन विल्यमसनने दुसऱ्या बाजूने आपल्या संघाची बाजू लावून धरली. विल्यमसनने 81 चेंडूत 7 चौकारांसह 64 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने एकही फलंदाज आपल्या कर्णधाराला साथ देऊ शकला नाही.

भारताकडून कुलदीप यादवने 4 तर मोहम्मद शमीने 3 फलंदाजांना माघारी धाडलं. या दोघांना युझवेंद्र चहलने 2 तर केदार जाधवने 1 विकेट घेत चांगली साथ दिली. या मालिकेतला दुसरा सामना 26 जानेवारी रोजी होणार आहे.

लोकसत्ता समालोचन
Live Blog
Highlights
 • 10:24 (IST)

  ट्रेंट बोल्ट माघारी, न्यूझीलंडचा डाव 157 धावांवर आटोपला

  कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने घेतला बोल्टचा झेल. भारताला विजयासाठी 158 धावांचं आव्हान

 • 09:59 (IST)

  अखेर कर्णधार केन विल्यमसन माघारी, न्यूझीलंडला सातवा धक्का

  कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात विल्यमसन उंच फटका खेळण्याच्या नादात केन माघारी

 • 09:26 (IST)

  कर्णधान केन विल्यमसनचं अर्धशतक

  केन विल्यमसनने एका बाजूने आपले सहकारी माघारी परतत असतानाही समर्थपणे भारतीय गोलंदाजीचा सामना करत अर्धशतक झळकावलं आहे.

 • 08:39 (IST)

  चहलने फोडली न्यूझीलंडची जमलेली जोडी, रॉस टेलर माघारी

  आपल्याच गोलंदाजीवर चहलने घेतला टेलरचा सुरेख झेल

 • 07:49 (IST)

  ठराविक अंतराने कॉलिन मुनरोही माघारी, शमीने उडवला त्रिफळा

  मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मुनरो पूर्णपणे फसला, न्यूझीलंडचे सलामीवीर स्वस्तात माघारी

 • 07:43 (IST)

  न्यूझीलंडला पहिला धक्का, गप्टील माघारी

  मोहम्मद शमीने गप्टीला त्रिफळा उडवत भारताला पहिलं यश मिळवून दिलं आहे. शमीची वन-डे क्रिकेटमधली ही शंभरावी विकेट ठरली आहे

13:42 (IST)23 Jan 2019
विराट कोहली माघारी, भारताला दुसरा धक्का

फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर विराट झेलबाद, मात्र भारत विजयाच्या जवळ

13:20 (IST)23 Jan 2019
शिखर धवनचं अर्धशतक, भारत विजयाच्या जवळ

रोहित माघारी परतल्यानंतर शिखरचं विराट कोहलीच्या साथीने अर्धशतक, भारताने ओलांडला 100 धावांचा टप्पा

12:02 (IST)23 Jan 2019
प्रखर सुर्यप्रकाशामुळे फलंदाजांना फलंदाजी करताना त्रास

पंचांनी काहीवेळसाठी सामना थांबवला

11:48 (IST)23 Jan 2019
उपहाराच्या विश्रांतीनंतर भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

डग ब्रेसवेलने दिला भारताला पहिला धक्का

11:10 (IST)23 Jan 2019
भारतीय सलामीवीरांची आक्रमक सुरुवात

रोहित शर्मा-शिखर धवन जोडीची फटकेबाजी. उपहारापर्यंत भारत 9 षटकांत बिनबाद 41

शिखर धवनने ओलांडला वन-डे क्रिकेटमध्ये 5 हजार धावांचा टप्पा

10:24 (IST)23 Jan 2019
ट्रेंट बोल्ट माघारी, न्यूझीलंडचा डाव 157 धावांवर आटोपला

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने घेतला बोल्टचा झेल. भारताला विजयासाठी 158 धावांचं आव्हान

10:08 (IST)23 Jan 2019
लॉकी फर्ग्युसन माघारी, न्यूझीलंडला नववा धक्का

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर फर्ग्युसन भोपळाही न फोडता माघारी

10:00 (IST)23 Jan 2019
त्याच षटकात कुलदीपचा न्यूझीलंडला आणखी एक धक्का, ब्रेसवेल माघारी

डग ब्रेसवेल कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी, न्यूझीलंडला आठवा धक्का

09:59 (IST)23 Jan 2019
अखेर कर्णधार केन विल्यमसन माघारी, न्यूझीलंडला सातवा धक्का

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात विल्यमसन उंच फटका खेळण्याच्या नादात केन माघारी

09:40 (IST)23 Jan 2019
न्यूझीलंडला सहावा धक्का, सँटनर माघारी

मोहम्मद शमीने केलं सँटनरला पायचीत, शमीचा सामन्यातला तिसरा बळी

09:26 (IST)23 Jan 2019
कर्णधान केन विल्यमसनचं अर्धशतक

केन विल्यमसनने एका बाजूने आपले सहकारी माघारी परतत असतानाही समर्थपणे भारतीय गोलंदाजीचा सामना करत अर्धशतक झळकावलं आहे.

09:17 (IST)23 Jan 2019
केदार जाधवने घेतला हेनरी निकोलसचा बळी

कुलदीप यादवने सुरेख उडी मारत निकोलसचा झेल घेतला, न्यूझीलंडचा निम्मा संघ माघारी

08:59 (IST)23 Jan 2019
ठराविक अंतराने टॉम लॅथम माघारी, न्यूझीलंडला चौथा धक्का

युझवेंद्र चहलने घेतला लॅथमचा बळी

08:39 (IST)23 Jan 2019
चहलने फोडली न्यूझीलंडची जमलेली जोडी, रॉस टेलर माघारी

आपल्याच गोलंदाजीवर चहलने घेतला टेलरचा सुरेख झेल

08:38 (IST)23 Jan 2019
केन विल्यमसन - रॉस टेलर जोडीने न्यूझीलंडचा डाव सावरला

दोघांनीही रचलेल्या छोटेखानी भागीदारीमुळे यजमान संघाने ओलांडला 50 धावांचा टप्पा

07:49 (IST)23 Jan 2019
ठराविक अंतराने कॉलिन मुनरोही माघारी, शमीने उडवला त्रिफळा

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मुनरो पूर्णपणे फसला, न्यूझीलंडचे सलामीवीर स्वस्तात माघारी

07:43 (IST)23 Jan 2019
न्यूझीलंडला पहिला धक्का, गप्टील माघारी

मोहम्मद शमीने गप्टीला त्रिफळा उडवत भारताला पहिलं यश मिळवून दिलं आहे. शमीची वन-डे क्रिकेटमधली ही शंभरावी विकेट ठरली आहे

07:36 (IST)23 Jan 2019
मार्टिन गप्टील आणि कॉलिन मुनरोची जोडी मैदानात

भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या षटकात बिनबाद पाच धावा

07:22 (IST)23 Jan 2019
मिचेल सँटनरचे न्यूझीलंडच्या संघात पुनरागमन

गुडघ्याच्या दुखापतीमुळे सँटनर आठ महिने संघाच्या बाहेर होता.

टॅग : Ind Vs Nz
Next Stories
1 ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : नदाल, क्विटोव्हा उपांत्य फेरीत
2 श्री समर्थ, ओम समर्थ संघांना विजेतेपद
3 प्रशांत, काजल यांची विजेतेपदाला गवसणी
Just Now!
X