News Flash

IND vs NZ : कुलदीपचा बळींचा चौकार, भारताचा ९० धावांनी विजय

विराटसेनेची भारतीयांना प्रजासत्ताक दिनाची भेट

India vs New Zealand 2nd ODI : कुलदीप यादवची भेदक गोलंदाजी आणि रोहित-धवन यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९० धावांनी पराभव केला. या विजयासह विराटसेनेने भारतीयांना प्रजासत्ताक दिनाची भेट दिली आहे. भारताने दिलेल्या ३२५ धावांचा पाठलाग करताना ४०.२ षटकांत न्यूझीलंडचा संघ २३४ धावांवर गारद झाला.

भारताच्या फिरकी गोलंदाजांनी सामन्यात सात बळी घेतले.  कुलदीप यादवने चार बळी घेत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. चहलने दोन आणि केदार जाधवने एक बळी घेत कुलदीपला चांगली साथ दिली. याशिवाय भुवनेश्वरने दोन आणि शामीने एका फलंदाजाला बाद केले. ३२५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला साजेशी सुरुवात करता आली नाही. दबावामध्ये फलंदाज ठरावीक अंतरावर बाद होत गेले. कर्णधार केन विलियम्सनने, रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन मुन्रो व हेन्री निकोल्स स्पशेल अपयशी ठरले. न्यूझीलंडकडून डग ब्रेसवेलचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. डग ब्रेसवेलने ५७ धावांची खेळी केली. अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या विजयासह पाच सामन्याच्या मालिकेत भारताने २-० ने आघाडी घेतली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ बाद ३२४ धावा केल्या. सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी अर्धशतक ठोकले. पण त्यानंतर धवन ६६ धावांवर बाद झाला. पाठोपाठ रोहित शर्मा ८७ धावांवर बाद झाला. विराट कोहलीने ४३ तर रायडूने ४७ धाव करत धावसंख्येत भर घातली. पण हे दोघेही बाद झाले. अखेर शेवटच्या काही षटकात धोनी (४८) आणि केदार जाधव (२२) यांनी फटकेबाजी करत भारताची धावसंख्या तीनशेपार नेली. न्यूझीलंडकडून बोल्ट आणि फर्ग्युसनने २-२ बळी टिपले.

Live Blog
Highlights
 • 14:28 (IST)

  भारताचा न्यूझीलंडवर ९० धावांनी विजय

  दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ९० धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंड संघाच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलेच झुंजवलं. मात्र, अखेर भुवनेश्वर आणि चहलने विकेट घेत न्यूझीलंडचा डाव संपवला. भारताकडून कुलदीपने चार विकेट घेतल्या.

 • 13:28 (IST)

  टॉम लॅथम पायचीत; न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद

  सलग दोन चेंडू चाचपडत खेळणारा टॉम लॅथम कुलदीपच्या तिसऱ्या चेंडूवर पायचीत झाला आणि न्यूझीलंडचा निम्मा संघ १४४ धावांवर गारद झाला. लॅथमने ३४ धावा केल्या.

 • 11:03 (IST)

  रोहित, धवनची फटकेबाजी; न्यूझीलंडपुढे ३२५ धावांचे आव्हान

  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ बाद ३२४ धावा केल्या आणि न्यूझीलंडपुढे ३२५ धावांचे आव्हान ठेवले. रोहित शर्माने सर्वाधिक ८७ धावा केल्या.

 • 07:07 (IST)

  नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी

  नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहली याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

14:28 (IST)26 Jan 2019
भारताचा न्यूझीलंडवर ९० धावांनी विजय

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ९० धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंड संघाच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलेच झुंजवलं. मात्र, अखेर भुवनेश्वर आणि चहलने विकेट घेत न्यूझीलंडचा डाव संपवला. भारताकडून कुलदीपने चार विकेट घेतल्या.

14:22 (IST)26 Jan 2019
डग ब्रेसवेल झेलबाद, न्यूझीलंडला नववा धक्का

डग ब्रेसवेल झेलबाद, न्यूझीलंडला नववा धक्का

14:13 (IST)26 Jan 2019
डग ब्रेसवेलचे झुंजार अर्धशतक

डग ब्रेसवेलचे झुंजार अर्धशतक

13:52 (IST)26 Jan 2019
निकल्स पाठोपाठ ईश सोढी बाद; न्यूझीलंडचे ८ गडी तंबूत

आधी निकल्स आणि पाठोपाठ ईश सोढी बाद झाला. कुलदीपने २ चेंडूत २ बळी टिपले आणि न्यूझीलंडचे ८ गडी तंबूत परतले. निकल्स २८ तर सोढी शून्यावर बाद झाला.

13:36 (IST)26 Jan 2019
कॉलिन डी ग्रँडहोम झेलबाद; न्यूझीलंडला सहावा धक्का

कॉलिन डी ग्रँडहोम ३ धावांवर माघारी परतला. रायडूने कुलदीपच्या गोलंदाजीवर झेल टिपत त्याला बाद केले.

13:28 (IST)26 Jan 2019
टॉम लॅथम पायचीत; न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद

सलग दोन चेंडू चाचपडत खेळणारा टॉम लॅथम कुलदीपच्या तिसऱ्या चेंडूवर पायचीत झाला आणि न्यूझीलंडचा निम्मा संघ १४४ धावांवर गारद झाला. लॅथमने ३४ धावा केल्या.

13:04 (IST)26 Jan 2019
रॉस टेलर माघारी; न्यूझीलंडचा चौथा गडी बाद

खेळपट्टीवर स्थिरावलेला अनुभवी फलंदाज रॉस टेलर माघारी परतला. केदार जाधवच्या गोलंदाजीवर त्याला धोनीने स्टंपिंग केले. त्याने २२ धावा केल्या.

12:53 (IST)26 Jan 2019
कॉलिन मुनरो पायचीत; न्यूझीलंडचा तिसरा गडी बाद

डावखुरा कॉलिन मुनरो विचित्र फटका खेळताना पायचीत झाला. स्टंपच्यापुढे मधोमध बसून त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो बाद झाला. त्याने ३१ धावा केल्या.

12:22 (IST)26 Jan 2019
कर्णधार विल्यमसन माघारी; न्यूझीलंडला दुसरा धक्का

पहिल्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा कर्णधार केन विल्यमसन आजच्या सामन्यात लवकर बाद झाला. २० धावांवर खेळताना तो त्रिफळाचीत झाला. शमीने त्याला माघारी धाडले.

12:09 (IST)26 Jan 2019
मार्टिन गप्टिल झेलबाद; न्यूझीलंडला पहिला धक्का

फटकेबाज सलामीवीर मार्टिन गप्टिल स्वस्तात बाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याचा अडसर दूर केला. त्याने १६ चेंडूत १५ धावा केल्या.

11:03 (IST)26 Jan 2019
रोहित, धवनची फटकेबाजी; न्यूझीलंडपुढे ३२५ धावांचे आव्हान

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ बाद ३२४ धावा केल्या आणि न्यूझीलंडपुढे ३२५ धावांचे आव्हान ठेवले. रोहित शर्माने सर्वाधिक ८७ धावा केल्या.

10:43 (IST)26 Jan 2019
कोहली पाठोपाठ रायडूचंही अर्धशतक हुकलं, भारताचे ४ गडी माघारी

रोहितचं शतक आणि कोहलीचं अर्धशतक हुकल्यानंतर रायडूचही अर्धशतक हुकलं. तो ४७ धावांवर बाद झाला. भारताचे ४ गडी माघारी परतले.

10:14 (IST)26 Jan 2019
कोहलीचं अर्धशतक हुकलं, भारताला तिसरा धक्का

कर्णधार कोहलीचे अर्धशतक हुकले. विराट ४३ धावांवर झेलबाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला.

09:33 (IST)26 Jan 2019
रोहितचं शतक हुकलं, भारताचा दुसरा गडी माघारी

फटकेबाजी करणारा भारताचा हिटमॅन रोहित शर्मा याचं शतक १३ धावांनी हुकलं. मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहित शर्मा झलबाड झाला आणि भारताचा दुसरा गडी माघारी परतला.

09:15 (IST)26 Jan 2019
शिखर धवन झेलबाद; भारताला पहिला धक्का

पहिल्या सामन्यात नाबाद राहिलेला शिखर धवन दुसऱ्या सामन्यात झेलबाद झाला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू टोलवण्याच्या प्रयत्नात भारताला पहिला धक्का बसला. धवन ६६ धावांवर बाद झाला.

08:56 (IST)26 Jan 2019
धवनचे मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक

पहिल्या सामन्यात नाबाद ७५ धावा करणाऱ्या धवनने दुसऱ्या सामन्यातही अर्धशतक ठोकले. त्याचे हे मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक ठरले.

08:43 (IST)26 Jan 2019
'हिटमॅन'चे अर्धशतक; टीम इंडियाची शतकी मजल

भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्मा याने षटकार लगावत आपले अर्धशतक साजरे केले. आखूड टप्प्याचा चेंडू हवेत टोलवत त्याने ५० धावांचा टप्पा गाठला आणि टीम इंडियाला शतकी मजल मारून दिली.

08:10 (IST)26 Jan 2019
नवव्या षटकात भारताचे अर्धशतक

सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी आक्रमक सुरुवात केली. त्यामुळे भारताला नवव्या षटकातच अर्धशतकी मजल मारता आली.

07:07 (IST)26 Jan 2019
नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी

नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहली याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Next Stories
1 विदर्भाची अंतिम फेरीत धडक
2 महाराष्ट्राच्या संघात प्रो कबड्डीचे तारे
3 जोकोव्हिच नदालशी झुंजणार
Just Now!
X