X
X

Ind vs NZ : परदेश दौऱ्याची विजयी सुरुवात, ६ गडी राखत भारताची बाजी

मालिकेतही भारताची १-० ने आघाडी

सलामीवीर लोकेश राहुलचं अर्धशतक आणि त्याला कर्णधार विराट कोहलीने दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात विजयाची नोंद केली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं २०४ धावांचं आव्हान भारताने ६ गडी राखत पूर्ण केलं. लोकेश राहुलने या सामन्यात ५६ तर विराट कोहलीने ४५ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनेही अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत नाबाद ५८ धावा केल्या. पहिल्या सामन्यातील विजयासह भारताने मालिकेत १-० ने आघाडीही घेतली आहे.

भारतीय डावाची सुरुवात खराब झाली, सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. मात्र यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी संयमी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी योग्य चेंडूवर फटकेबाजी करत संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. लोकेश राहुलने यादरम्यान आपलं अर्धशतकही साजरं केलं. ५६ धावांवर राहुल इश सोधीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र मोक्याच्या षटकांमध्ये विराट माघारी परतला. यानंतर श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

त्याआधी, कर्णधार केन विल्यमसन आणि सलामीवीर कॉलिन मुनरो आणि अनुभवी रॉस टेलर यांनी झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात २०३ धावांपर्यंत मजल मारली. घरचा हंगाम गाजवल्यानंतर न्यूझीलंडच्या मैदानावर भारतीय गोलंदाजांचा खऱ्या अर्थाने कस लागला, मात्र मधल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनीही दमदार पुनरागमन केलं. मुनरोने ५९, टेलरने नाबाद ५४ तर विल्यमसनने ५१ धावांची खेळी केली.

नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा विराट कोहलीचा निर्णय पुरता चुकला. सलामीवीर कॉलिन मुनरो आणि मार्टीन गप्टील या जोडीने सुरुवातीच्या षटकांपासून फटकेबाजी सुरु केली. न्यूझीलंडमधील छोट्या मैदानांचा फारसा अंदाज न आल्यामुळे भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये स्वैर मारा केला. सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. शिवम दुबेने मार्टीन गप्टीलला माघारी धाडण्यात यश मिळवलं, आणि न्यूझीलंडला पहिला धक्का बसला.

यानंतर कॉलिन मुनरोने कर्णधार विल्यमसनच्या साथीने धावांचा ओघ वाढवत आपलं अर्धशतक झळकावलं. शार्दुल ठाकूरने त्याला माघारी धाडल्यानंतर कर्णधार विल्यमसनने जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत फटकेबाजीला सुरुवात केली. विल्यमसनही अर्धशतक झळकावल्यानंतर माघारी परतला. मधल्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगलं पुनरागमन केलं, मात्र न्यूझीलंडच्या धावगतीवर अंकुश ठेवण्यात ते अपयशी ठरले. अनुभवी रॉस टेलरनेही शेवटच्या षटकांत भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतक झळकावलं. त्याने नाबाद धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, शिवम दुबे आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

लोकसत्ता समालोचन

न्यूझीलंडमधील भारत, 5 टी 20 आय मालिका, 2020ईडन पार्क, ऑकलंड 18 February 2020

न्युझीलँड 203/5 (20.0)

vs

भारत 204/4 (19.0)

सामना समाप्त ( Day - पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय ) भारत ने न्युझीलँड चा 6 गडी राखून पराभव केला

Live Blog

Highlights

15:05 (IST)

लोकेश राहुल माघारी, भारताला दुसरा धक्का

इश सोधीच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात लोकेश राहुल माघारी, टीम साऊदीने घेतला झेल

२७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने राहुलच्या ५६ धावा

14:57 (IST)

सलामीवीर लोकेश राहुलचं अर्धशतक

भारतीय संघाची झुंज सुरुच, ओलांडला शतकी धावसंख्येचा टप्पा

14:39 (IST)

राहुल-विराट जोडीने सावरला संघाचा डाव

भारतीय संघाने ओलांडला अर्धशतकी धावसंख्येचा टप्पा

14:22 (IST)

भारताची खराब सुरुवात, रोहित शर्मा माघारी

मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद, भारताला पहिला धक्का

13:44 (IST)

कर्णधार विल्यमसनचं अर्धशतक

जमलेली जोडी माघारी परतल्यानंतर, कर्णधार विल्यमसनची फटकेबाजी

युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर चौकार लगावत झळकावलं अर्धशतक

13:21 (IST)

मुनरोला माघारी धाडण्यात भारताला यश

शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर युजवेंद्र चहलने घेतला मुनरोचा झेल

४२ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने मुनरोच्या ५९ धावा

13:04 (IST)

न्यूझीलंडला पहिला धक्का, मार्टीन गप्टील बाद

शिवम दुबेच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने घेतला गप्टीलचा झेल

पहिल्या विकेटसाठी न्यूझीलंड सलामीवीरांची ८२ धावांची भागीदारी

12:45 (IST)

न्यूझीलंडच्या सलामीवीरांची धडाकेबाज सुरुवात

कॉलिन मुनरो आणि मार्टीन गप्टील जोडीची ऑकलंडच्या मैदानावर फटकेबाजी

पाचव्या षटकातच ओलांडला ५० धावांचा टप्पा

15:50 (IST)24 Jan 2020
श्रेयस अय्यर - मनिष पांडे जोडीची निर्णयाक भागीदारी

विजयी फटका खेचत अय्यरचं अर्धशतक, भारताची सामन्यात ६ गडी राखून बाजी

मालिकेतही भारताची १-० ने आघाडी

15:20 (IST)24 Jan 2020
फटकेबाजी करणारा शिवम दुबे माघारी, भारताला चौथा धक्का

इश सोधीच्या गोलंदाजीवर दुबे माघारी, १३ धावा काढत सोधी बाद

15:10 (IST)24 Jan 2020
ठराविक अंतराने विराट कोहलीही माघारी, भारताला तिसरा धक्का

ब्लेअर टिकनरच्या गोलंदाजीवर मार्टीन गप्टीलने घेतला विराटचा झेल, मोक्याच्या क्षणी भारताचा कर्णधार बाद

विराट कोहलीची ४५ धावांची खेळी

15:05 (IST)24 Jan 2020
लोकेश राहुल माघारी, भारताला दुसरा धक्का

इश सोधीच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात लोकेश राहुल माघारी, टीम साऊदीने घेतला झेल

२७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने राहुलच्या ५६ धावा

14:57 (IST)24 Jan 2020
सलामीवीर लोकेश राहुलचं अर्धशतक

भारतीय संघाची झुंज सुरुच, ओलांडला शतकी धावसंख्येचा टप्पा

14:39 (IST)24 Jan 2020
राहुल-विराट जोडीने सावरला संघाचा डाव

भारतीय संघाने ओलांडला अर्धशतकी धावसंख्येचा टप्पा

14:22 (IST)24 Jan 2020
भारताची खराब सुरुवात, रोहित शर्मा माघारी

मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद, भारताला पहिला धक्का

14:05 (IST)24 Jan 2020
पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडची २०३ धावांपर्यंत मजल

भारताला विजयासाठी खडतर आव्हान, टेलर-विल्यमसन-मुनरोची अर्धशतकी खेळी

14:00 (IST)24 Jan 2020
अनुभवी रॉस टेलरचीही अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी

भारतीय गोलंदाजांच्या स्वैर माऱ्याचा फायदा घेत झळकावलं अर्धशतक

13:50 (IST)24 Jan 2020
न्यूझीलंडला पाचवा धक्का

टीम सेफर्ट जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर माघारी, मात्र यजमानांची २०० धावांचा टप्पा ओलांडण्याच्या दिशेने वाटचाल

13:45 (IST)24 Jan 2020
विल्यमसनला माघारी धाडण्यात चहलला यश

उंच फटका खेळण्याच्या नादात चेंडू बॅटची कड घेऊन विराट कोहलीच्या हातात

न्यूझीलंडला चौथा धक्का, विल्यमसनची २६ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५१ धावांची खेळी

13:44 (IST)24 Jan 2020
कर्णधार विल्यमसनचं अर्धशतक

जमलेली जोडी माघारी परतल्यानंतर, कर्णधार विल्यमसनची फटकेबाजी

युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर चौकार लगावत झळकावलं अर्धशतक

13:23 (IST)24 Jan 2020
न्यूझीलंडला तिसरा धक्का, डी-ग्रँडहोम माघारी

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता कॉलिन डी-ग्रँडहोम माघारी, शिवम दुबेने घेतला झेल

13:21 (IST)24 Jan 2020
मुनरोला माघारी धाडण्यात भारताला यश

शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर युजवेंद्र चहलने घेतला मुनरोचा झेल

४२ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने मुनरोच्या ५९ धावा

13:15 (IST)24 Jan 2020
कॉलिन मुनरोचं अर्धशतक, न्यूझीलंडने ओलांडला शतकी टप्पा

भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत मुनरोची फटकेबाजी, झळकावलं अर्धशतक

न्यूझीलंडची सामन्यावर पकड कायम

20
First Published on: January 24, 2020 12:22 pm
  • Tags: ind-vs-nz,
  • Just Now!
    X