भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचं अखेरचं सत्र पावसामुळे वाया गेलं आहे. चहापानाच्या सत्रापर्यंत भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात १२२ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र चहापानानंरच्या सत्रानंतर पावसाने सामन्यात हजेरी लावल्यामुळे उरलेल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. पहिल्या सत्राअखेरीस भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात ७९ धावांपर्यंत मजल मारली होती. या सत्रानंतर मयांक अग्रवाल ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर हनुमा विहारीही जेमिसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र अजिंक्य रहाणेने एकाकी झुंज देत भारताचं आव्हान कायम राखलं आहे. आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या जेमिसनने भारतीय संघाला धक्के दिले.

त्याआधी, उप-कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सलामीवीर मयांक अग्रवाल यांनी पहिल्या सत्रात केलेल्या संयमी खेळामुळे भारताने आपला डाव सावरला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेलिंग्टनच्या खेळपट्टीवरील गवत आणि वाऱ्यामुळे सुरुवातीच्या काही षटकांमध्ये भारतीय फलंदाजांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यातच आपला पहिला सामना खेळणाऱ्या जेमिसनने भारतीय संघाला दणके दिले. मात्र अजिंक्य आणि मयांकने खेळपट्टीवर तग धरत भारताचा डाव सावरला.

सुरुवातीच्या षटकांमध्ये पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या जोडीने भारतीय डावाची सावध सुरुवात करण्याकडे भर दिला. मात्र टीम साऊदीने पृथ्वी शॉचा त्रिफळा उडवत भारताला पहिला धक्का दिला. वेलिंग्टनची खेळपट्टी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगली साथ देत होती, याचा फायदा घेत जेमिसनने सुरेख मारा करत भारतीय फलंदाजांना कात्रीत पकडलं. चेतेश्वर पुजारा यष्टीरक्षक वॉटलिंगकडे झेल देत माघारी परतला, यानंतर कर्णधार विराट कोहलीही अवघ्या २ धावा काढत माघारी परतला. मात्र यानंतर अजिंक्य आणि मयांकने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करत अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली.

Live Blog

10:32 (IST)21 Feb 2020
पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द

अजिंक्य रहाणेमुळे भारताचं आव्हान कायम

09:21 (IST)21 Feb 2020
मैदानातली आताची परिस्थिती...
09:09 (IST)21 Feb 2020
वेलिंग्टनमध्ये पावसाची हजेरी, सामना सुरु होण्यासाठी विलंब होणार
08:50 (IST)21 Feb 2020
चहापानाच्या सत्रापर्यंत भारताचे ५ गडी माघारी

अजिंक्य रहाणेची झुंज सुरु, भारत ५ बाद १२२

07:46 (IST)21 Feb 2020
भारताला पाचवा धक्का, हनुमा विहारी माघारी

जेमिसनच्या माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांची शरणागती

हनुमा विहारी यष्टीरक्षक वॉटलिंगकडे झेल देत माघारी

07:36 (IST)21 Feb 2020
भारताने ओलांडला शतकी धावसंख्येचा टप्पा

उप-कर्णधार अजिंक्य रहाणेची हनुमा विहारीच्या साथीने झुंज सुरुच

07:13 (IST)21 Feb 2020
उपहाराच्या सत्रानंतर भारताला पहिला धक्का, मयांक माघारी

ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नाच चेंडू मयांकच्या बॅटची कड घेऊन हवेत

सीमारेषेवर उभ्या असलेल्या जेमिसनने पकडला मयांकचा झेल, मयांकची ३४ धावांची खेळी

06:15 (IST)21 Feb 2020
पहिल्या सत्राअखेरीस भारताचा डाव सावरला

मयांक-अजिंक्य जोडीची संयमी फलंदाजी

पहिल्या सत्राअखेरीस भारत ३ गडी बाद ७९

05:39 (IST)21 Feb 2020
भारताने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा

मयांक अग्रवाल, अजिंक्य रहाणे जोडीची झुंज सुरु

05:26 (IST)21 Feb 2020
कर्णधार विराट कोहली बाद, भारताला तिसरा धक्का

जेमिसनच्या गोलंदाजीवर रॉस टेलरने स्लिपमध्ये घेतला कोहलीचा झेल

अवघ्या २ धावा काढून कोहली माघारी परतला

05:14 (IST)21 Feb 2020
भारताला दुसरा धक्का, चेतेश्वर पुजारा माघारी

नवोदीत जेमिसनच्या गोलंदाजीवर वॉटलिंगकडे झेल देत पुजारा माघारी

05:06 (IST)21 Feb 2020
पहिल्या तासाचा खेळ संपला

१४ षटकांत भारताची एका गड्याच्या मोबदल्यात ३५ धावांपर्यंत मजल

04:23 (IST)21 Feb 2020
भारताची सलामीची जोडी फोडण्यात न्यूझीलंडला यश

पृथ्वी शॉ टीम साऊदीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत

टप्पा पडून वळलेला साऊदीचा चेंडू शॉला कळलाच नाही, १६ धावा काढत पृथ्वी माघारी

04:00 (IST)21 Feb 2020
भारतीय संघातही बदल, ऋषभ पंतचं पुनरागमन
03:59 (IST)21 Feb 2020
असा असेल न्यूझीलंडचा अंतिम ११ जणांचा संघ...
03:58 (IST)21 Feb 2020
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली

कर्णधार केन विल्यमसनचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय