02 July 2020

News Flash

Ind vs NZ 1st Test Day 2 : विल्यमसनच्या अर्धशतकामुळे न्यूझीलंडला आघाडी

अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाजांचं दमदार पुनरागमन

कर्णधार केन विल्यमसन, टॉम ब्लंडल आणि रॉस टेलर यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने वेलिंग्टन कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने ५ गडी गमावत २१६ धावांपर्यंत मजल मारली होती. न्यूझीलंडकडे सध्याच्या घडीला ५१ धावांची आघाडी आहे. कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलरने फटकेबाजी करत न्यूझीलंडला आघाडी मिळवून देण्यात मदत केली. तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी करणाऱ्या रॉस टेलरचं अर्धशतक ६ धावांनी तर कर्णधार केन विल्यमसनचं शतक ११ धावांनी हुकलं. भारताकडून इशांत शर्माने दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ३ तर मोहम्मद शमी आणि रविचंद्रन आश्विनने प्रत्येकी १-१ बळी घेतला. विल्यमसनने ८९ धावा केल्या.

दरम्यान, भारतीय संघाला पहिल्या डावात झटपट माघारी धाडण्यात यश आल्यानंतर न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावाची सुरुवात सावध पद्धतीने केली. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत यजमान संघाने एकही गडी न गमावता भारतीय गोलंदाजांचा सामना केला. दुसऱ्या सत्रात भारताकडून इशांत शर्माने दोन बळी घेतले खरे, मात्र तोपर्यंत न्यूझीलंडने शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडला होता. दुसऱ्या दिवशी चहापानाच्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने २ गड्यांच्या मोबदल्यात ११६ धावांपर्यंत मजल मारली. चहापानानंतरही न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, मात्र भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत निम्मा संघ माघारी धाडला.

त्याआधी, वेलिंग्टन कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारतीय संघाला १६५ धावांपर्यंत रोखण्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना यश आलं. पहिल्या दिवशी भारताचा निम्मा संघ गारद केल्यानंतर, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना फारशी संधी न देता डाव झटपट गुंडाळला. भारताकडून अजिंक्य रहाणेने एकाकी झुंज दिली. मात्र जेमिसन आणि टीम साऊदीच्या माऱ्यासमोर भारतीय फलंदाज टिकू शकले नाहीत.

दुसऱ्या दिवशीही भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ऋषभ पंत चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद होऊन माघारी परतला. अजिंक्य रहाणे एकाबाजूने झुंज देण्याचा प्रयत्न करत होता, मात्र टीम साऊदीच्या गोलंदाजीवर तो देखील माघारी परतला. त्याने ४६ धावांची खेळी केली. यानंतर मोहम्मद शमीने फटकेबाजी करत भारताच्या खात्यात काही धावांची भर घातली, मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताच्या शेपटाला फारशी वळवळ करण्याची संधी दिली नाही. यजमान संघाकडून टीम साऊदी आणि जेमिसन यांनी प्रत्येकी ४-४ तर ट्रेंट बोल्टने एक बळी घेतला. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.

लोकसत्ता समालोचन

Live Blog

11:49 (IST)22 Feb 2020
अंधुक प्रकाशामुळे पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला

दुसऱ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंड ५ बाद २१६

पहिल्या डावात यजमान संघाकडे ५१ धावांची आघाडी

11:32 (IST)22 Feb 2020
न्यूझीलंडचा निम्मा संघ माघारी, भारतीय गोलंदाजांचं दमदार पुनरागमन

हेन्री निकोल्स आश्विनच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कोहलीकडे झेल देत बाद

11:03 (IST)22 Feb 2020
कर्णधार केन विल्यमसन माघारी, न्यूझीलंडला चौथा धक्का

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर बदली खेळाडू रविंद्र जाडेजाने घेतला झेल

८९ धावांवर विल्यमसन माघारी,  धडाकेबाज  खेळीनंतर ११ धावांनी न्यूझीलंड कर्णधाराचं शतक हुकलं

10:17 (IST)22 Feb 2020
इशांतने मिळवून दिला भारताला महत्वाचा ब्रेक-थ्रू

मैदानावर जम बसवलेला रॉस टेलर माघारी, न्यूझीलंडला तिसरा धक्का

चेतेश्वर पुजाराने घेतला झेल, टेलरची ४४ धावांची महत्वपूर्ण खेळी

10:16 (IST)22 Feb 2020
पहिल्या डावात न्यूझीलंडला आघाडी

कर्णधार विल्यमसन आणि रॉस टेलरची तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी

09:33 (IST)22 Feb 2020
केन विल्यमसनचं अर्धशतक, न्यूझीलंडची आघाडीकडे वाटचाल

रॉस टेलरच्या साथीने विल्यमसनची आश्वासक फलंदाजी, भारतीय गोलंदाज हतबल

09:05 (IST)22 Feb 2020
चहापानाच्या सत्राची घोषणा, न्यूझीलंडची कसोटीवर मजबूत पकड

कर्णधार विल्यमसन, रॉस टेलरची संयमी फलंदाजी

चहापानाच्या सत्रापर्यंत न्यूझीलंड २ गडी बाद ११६

08:11 (IST)22 Feb 2020
इशांत शर्माने फोडली न्यूझीलंडची जमलेली जोडी

टॉम ब्लंडलचा ३० धावांवर उडवला त्रिफळा

ब्लंडलची कर्णधार विल्यमसनसोबत ४७ धावांची  महत्वपूर्ण भागीदारी 

07:50 (IST)22 Feb 2020
न्यूझीलंडचा डाव सावरला, ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा

कर्णधार केन विल्यमसन आणि टॉम ब्लंडल जोडीची संयमी फलंदाजी

06:54 (IST)22 Feb 2020
उपहारानंतरच्या सत्रानंतर यजमानांना पहिला धक्का

टॉम लॅथम इशांत शर्माच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक पंतकडे झेल देऊन माघारी

06:07 (IST)22 Feb 2020
न्यूझीलंडच्या सलामीवीरांची सावध सुरुवात

भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत पहिलं सत्र खेळून काढलं

एकही गडी न गमावता न्यूझीलंडची १७ धावांपर्यंत मजल

05:16 (IST)22 Feb 2020
पहिल्या डावात टीम इंडियाची १६५ धावांपर्यंत मजल

भारताकडून अजिंक्य रहाणेची एकाकी झुंज

अवश्य वाचा - Ind vs NZ : अजिंक्य रहाणेच्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट

05:15 (IST)22 Feb 2020
भारताचा अखेरचा गडी बाद, मोहम्मद शमी माघारी

टीम साऊदीच्या गोलंदाजीवर शमी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद

तळातल्या फलंदाजांच्या साथीने शमीची फटकेबाजी, भारताला गाठून दिली सन्मानजनक धावसंख्या

मोहम्मद शमीची २१ धावांची खेळी

05:13 (IST)22 Feb 2020
भारताला नववा धक्का, इशांत शर्मा माघारी

जेमिसनच्या गोलंदाजीवर वॉटलिंगने घेतला झेल

04:40 (IST)22 Feb 2020
भारताला मोठा धक्का, अजिंक्य रहाणे माघारी

टीम साऊदीच्या गोलंदाजीवर चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात रहाणे झेलबाद

१३८ चेंडूत ५ चौकारांसह अजिंक्यची ४६ धावांची खेळी

04:21 (IST)22 Feb 2020
रविचंद्रन आश्विन त्रिफळाचीत, भारताला सातवा धक्का

टीम साऊदीने आपल्या नवीन षटकात उडवला आश्विनचा त्रिफळा

आऊटस्विंग चेंडूवर आश्विन पूर्णपणे गडबडला, भारताची हाराकिरी सुरुच

04:20 (IST)22 Feb 2020
दुसऱ्या दिवशी भारताला पहिला धक्का, ऋषभ पंत धावबाद

अजिंक्य रहाणेसोबत चोरटी धाव घेताना ऋषभ पंत गोंधळला

ऐजाझ पटेलच्या अचूक फेकीमुळे पंत धावबाद, भारताला सहावा धक्का

03:53 (IST)22 Feb 2020
पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवसाचं वातावरण स्वच्छ
टॅग Ind Vs Nz
Next Stories
1 आशियाई कुस्ती स्पर्धा : साक्षी मलिकला रौप्यपदक
2 प्रग्यान ओझाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
3 ‘एफआयएच’ प्रो हॉकी लीग : भारताची झुंज अपयशी
Just Now!
X