News Flash

टीम इंडियाने करुन दाखवलं ! टी-२० मालिकेत न्यूझीलंडला व्हाईटवॉश

अखेरच्या सामन्यात भारताची ७ धावांनी बाजी

नवीन वर्षात आपला पहिला परदेश दौरा खेळणाऱ्या भारतीय संघाने इतिहासाची नोंद केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात ७ धावांनी विजय मिळवत भारताने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे. न्यूझीलंडच्या भूमीवर अशी कामगिरी करण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ ठरली आहे. भारताने विजयासाठी दिलेलं १६४ धावांचं आव्हान यजमान संघाला पेलवलं नाही. रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी अर्धशतक झळकावत चांगले प्रयत्न केले, मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत न्यूझीलंडची विजयाची संधी हिरावून घेतली.

भारतीय गोलंदाजांनी सामन्याची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. अवघ्या १७ धावांत न्यूझीलंडचे आघाडीचे ३ फलंदाज माघारी परतले होते. मात्र यानंतर टीम सेफर्ट आणि रॉस टेलर यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचत सामन्याचं पारडं आपल्या बाजूने फिरवलं. या दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत, भारतीय गोटात चिंतेचं वातावरण तयार केलं. शिवम दुबेच्या गोलंदाजीवर तर दोन्ही फलंदाजांनी ३४ धावा कुटल्या. मात्र नवदीप सैनीने सेफर्टला माघारी धाडत न्यूझीलंडची जमलेली जोडी फोडली.

अर्धशतकवीर सेफर्ट माघारी परतल्यानंतर, नेहमीप्रमाणेच न्यूझीलंडच्या अखेरच्या फलंदाजांनी निराशा केली. एकामागोमाग एक विकेट फेकत न्यूझीलंडने सोपं आव्हान कठीण करुन ठेवलं. टेलरने एका बाजूने बाजू सांभाळत आपलं अर्धशतक झळकावलं खरं, मात्र तो देखील सैनीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. इश सोधीने शार्दुल ठाकूरच्या अखेरच्या षटकात दोन षटकार खेचत सामन्यात रंगत आणली होती. मात्र, भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या शेपटाला फारसं वळवळण्याची संधी न देता संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३, नवदीप सैनी-शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २-२ तर वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला.

त्याआधी, कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर लोकेश राहुलच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारताने अखेरच्या टी-२० सामन्यात १६३ धावांपर्यंत मजल मारली . विराट कोहलीला विश्रांती देत भारतीय संघ व्यवस्थापनाने रोहितकडे संघाचं नेतृत्व सोपवलं. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र डावाची सुरुवात चांगली झाली नाही. अखेरच्या षटकांमध्येही न्यूझीलंडने टिच्चून मारा करत भारतीय फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. न्यूझीलंडकडून कुगलेजनने २ तर हमिश बेनेटने १ बळी घेतला.

युवा फलंदाज संजू सॅमसनने अखेरच्या सामन्यातही निराशा केला. केवळ २ धावा काढून कुगलेजनच्या गोलंदाजीवर सॅमसन माघारी परतला, मात्र यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार रोहित शर्माने भारतीय संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. ही जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारुन देणार असं वाटत असतानाच राहुल ४५ धावांवर माघारी परतला.

राहुल माघारी परतल्यानंतर भारताची धावगती मंदावली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी श्रेयस अय्यरवर दबाव टाकत त्याला मोठे फटके खेळायला दिले नाहीत. दरम्यान, रोहित शर्माने दरम्यानच्या काळात आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र मोक्याच्या षटकांमध्ये धावा जमावण्यात भारताचे फलंदाज अपयशी ठरले. ६० धावांवर खेळत असताना रोहित शर्माच्या पोटरीचे स्नायु दुखावल्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. याचा फायदा घेत न्यूझीलंडने भारतावर आणखी दबाव टाकला. शिवम दुबेही फटकेबाजी करण्याच्या नादात माघारी परतला. अखेरीस मनिष पांडे आणि श्रेयस अय्यरने भारताला १६३ धावांपर्यंतचा पल्ला गाठून दिला.

लोकसत्ता समालोचन
Live Blog
Highlights
 • 13:50 (IST)

  भारताला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्माने दुखापतीमुळे सोडलं मैदान

  ६० धावा करत रोहित उपचार घेण्यासाठी मैदानाबाहेर

 • 13:24 (IST)

  अखेर भारताची जमलेली जोडी फुटली, लोकेश राहुल माघारी

  हमीश बेनेटच्या गोलंदाजीवर चेंडू राहुलच्या बॅटची कड घेऊन सँटनरच्या हातात

  भारताला दुसरा धक्का, राहुलची ३३ चेंडूत ४ चौकार आणि दोन षटकारांसह ४५ धावांची खेळी

 • 13:23 (IST)

  लोकेश राहुल आणि रोहित शर्मा जोडीने सावरला भारताचा डाव

  दुसऱ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये ८८ धावांची भागीदारी

 • 12:39 (IST)

  भारताला पहिला धक्का, संजू सॅमसन बाद

  अखेरच्या सामन्यातही सॅमसन अपयशी, कुगलेजनच्या गोलंदाजीवर सँटनरने घेतला झेल

  अवघ्या २ धावा काढून सॅमसन माघारी

16:12 (IST)02 Feb 2020
भारताची अखेरच्या सामन्यात बाजी

७ धावांनी जिंकला सामना, मालिकेतही ५-० ने मिळवला विजय

न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिकेत व्हाईटवॉश देण्याची भारतीय संघाची पहिलीच वेळ

15:59 (IST)02 Feb 2020
न्यूझीलंडला नववा धक्का, साऊदी माघारी

जसप्रीत बुमराहने घेतला बळी

15:52 (IST)02 Feb 2020
न्यूझीलंडला मोठा धक्का, रॉस टेलर माघारी

नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलने घेतला झेल

५३ धावा काढून टेलर माघारी परतला, न्यूझीलंडला आठवा धक्का

15:49 (IST)02 Feb 2020
त्याच षटकात कुगलेजन माघारी, न्यूझीलंडला सातवा धक्का

शार्दुल ठाकूरला एका षटकात दुसरा बळी, वॉशिंग्टन सुंदरने घेतला झेल

15:47 (IST)02 Feb 2020
न्यूझीलंडला सहावा धक्का, मिचेल सँटनर माघारी

शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर मनिष पांडेने घेतला झेल

15:46 (IST)02 Feb 2020
रॉस टेलरचं अर्धशतक

१०० वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळणाऱ्या टेलरची झुंज सुरुच

15:32 (IST)02 Feb 2020
न्यूझीलंडला पाचवा धक्का, सामन्यात रंगत कायम

मिचेल बुमराहच्या गोलंदाजीवर २ धावांवर त्रिफळाचीत

15:23 (IST)02 Feb 2020
नवदीप सैनीने धाडलं सेफर्टला माघारी, न्यूझीलंडला चौथा धक्का

३० चेंडूत ५० धावा करत सेफर्ट सैनीच्या गोलंदाजीवर माघारी, सॅमसनने घेतला झेल

15:22 (IST)02 Feb 2020
टीम सेफर्टचं अर्धशतक, न्यूझीलंडला विजयाची संधी

रॉस टेलरच्या भक्कम साथीच्या जोरावर सेफर्टची फटकेबाजी

15:15 (IST)02 Feb 2020
टीम सेफर्ट आणि रॉस टेलर जोडीने सावरला संघाचा डाव

चौथ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी, संघाने ओलांडला शतकी धावसंख्येचा टप्पा

शिवम दुबेच्या गोलंदाजीवर दोन्ही फलंदाजांनी कुटल्या ३४ धावा

14:39 (IST)02 Feb 2020
न्यूझीलंडला तिसरा धक्का, टॉम ब्रुस धावबाद

नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात ब्रुस माघारी

14:31 (IST)02 Feb 2020
कॉलिन मुनरोही माघारी परतला, न्यूझीलंडला दुसरा धक्का

वॉशिंग्टन सुंदरने उडवला मुनरोचा त्रिफळा

14:25 (IST)02 Feb 2020
न्यूझीलंडला पहिला धक्का, मार्टीन गप्टील माघारी

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर गप्टील पायचीत होऊन माघारी

14:09 (IST)02 Feb 2020
भारताची अखेरच्या टी-२० सामन्यात १६३ धावांपर्यंत मजल

न्यूझीलंडला विजयासाठी १६४ धावांचं आव्हान

14:02 (IST)02 Feb 2020
भारताला तिसरा धक्का, शिवम दुबे माघारी

कुगलेजनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात दुबे बाद

मोक्याच्या क्षणी भारताची धावगती मंदावली

13:50 (IST)02 Feb 2020
भारताला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्माने दुखापतीमुळे सोडलं मैदान

६० धावा करत रोहित उपचार घेण्यासाठी मैदानाबाहेर

13:39 (IST)02 Feb 2020
कर्णधार रोहित शर्माचं अर्धशतक, भारताचा मोठी धावसंख्या गाठण्याचा प्रयत्न

मधल्या षटकांत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचं दमदार पुनरागमन, भारताची धावगती मंदावली

रोहित-श्रेयस अय्यर जोडीकडून पुन्हा एकदा फटकेबाजीला सुरुवात, रोहितने झळकावलं अर्धशतक

13:24 (IST)02 Feb 2020
अखेर भारताची जमलेली जोडी फुटली, लोकेश राहुल माघारी

हमीश बेनेटच्या गोलंदाजीवर चेंडू राहुलच्या बॅटची कड घेऊन सँटनरच्या हातात

भारताला दुसरा धक्का, राहुलची ३३ चेंडूत ४ चौकार आणि दोन षटकारांसह ४५ धावांची खेळी

13:23 (IST)02 Feb 2020
लोकेश राहुल आणि रोहित शर्मा जोडीने सावरला भारताचा डाव

दुसऱ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये ८८ धावांची भागीदारी

12:39 (IST)02 Feb 2020
भारताला पहिला धक्का, संजू सॅमसन बाद

अखेरच्या सामन्यातही सॅमसन अपयशी, कुगलेजनच्या गोलंदाजीवर सँटनरने घेतला झेल

अवघ्या २ धावा काढून सॅमसन माघारी

12:13 (IST)02 Feb 2020
न्यूझीलंडच्या संघातही बदल नाहीत...
https://platform.twitter.com/widgets.js
12:12 (IST)02 Feb 2020
असा असेल भारताचा अंतिम ११ जणांचा संघ...
https://platform.twitter.com/widgets.js
12:12 (IST)02 Feb 2020
भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

कर्णधार विराट कोहलीला विश्रांती, रोहित शर्माकडे भारतीय संघाचं नेतृत्व

टॅग : Ind Vs Nz
Next Stories
1 Ind vs NZ : भारताची वाटचाल निर्भेळ यशाकडे
2 क्षेत्ररक्षणात सुधारण्याचे भारतापुढे आव्हान
3 डाव मांडियेला : दस्त वाढवण्याचं एक तंत्र!
Just Now!
X