आघाडीच्या फलंदाजांकडून कमालीची निराशा झाल्यानंतर मधल्या फळीतल्या हार्दिक पांड्याने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताचं केप टाऊन कसोटीतलं आव्हान अजुनही कायम आहे. एकामागोमाग एक विकेट जाण्याचं सत्र सुरु असताना हार्दिक पांड्याने एका बाजूने आपली आक्रमक फलंदाजी कायम ठेवत भारताची बाजू सावरुन धरली. भुवनेश्वर कुमारच्या साथीने भारताचा डाव सावरताना पांड्याने आपलं शतकही पूर्ण केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे पांड्याने फिलँडर आणि इतर जलदगती गोलंदाजांना नेटाने सामना करत चौफेर फटकेबाजी केली. या फटकेबाजीमुळे चाचपडणारा भारतीय संघ काहीसा स्थिरावलेला पहायला मिळाला.

भारताचा पहिला डाव २०९ धावांत संपुष्टात आणल्यानंतर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या दिवसाच्या उर्वरित षटकांमध्ये आपली ७७ धावांची आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करेल. तळातल्या भारतीय फलंदाजांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांना या सामन्यात चांगलच झुंजवल असलं तरीही अद्याप केप टाऊन कसोटीवर यजमान दक्षिण आफ्रिका आपला पगडा कायम राखण्यात काही प्रमाणात यशस्वी झाली आहे.

यानंतर दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने एडन मार्क्रम आणि डीन एल्गर यांच्यातल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर चांगली सुरुवात केली. मात्र फलंदाजीतून भारतीय संघाचा डाव सावरणाऱ्या हार्दिक पांड्याने आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडत भारताचं  आव्हान सामन्यात कायम ठेवलं. एल्गर आणि मार्क्रम यांचा बळी घेत पांड्याने आपल्या अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन घडवलं. त्यामुळे तिसऱ्या दिवशी केप टाऊनची खेळपट्टी काय रंग दाखवते आणि भारतीय गोलंदाज कसा खेळ करतात त्यावर या सामन्याचा निकाल अवलंबून असेल.

  • दक्षिण आफ्रिकेकडे दुसऱ्या दिवसाअखेरीस १४२ धावांची आघाडी
  • अखेर पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला, दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ६५/२
  • नाईट वॉचमन कगिसो रबाडाने आफ्रिकेची पडझड थांबवली
  • फलंदाजीनंतर गोलंदाजीतही हार्दिक पांड्याची धडाकेबाज कामगिरी, दोन्ही सलामीवीरांना धाडलं माघारी
  • ठराविक अंतराने डीन एल्गरला माघारी धाडण्यात भारताला यश
  • दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का, हार्दिक पांड्याला मिळाली विकेट
  • हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या नादात एडन मार्क्रम माघारी
  • दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी, आफ्रिकेची आघाडी १०० धावांवर
  • एडन मार्क्रम आणि डीन एल्गर जोडीचा झटपट धावा काढण्याकडे भर
  • दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावात आक्रमक सुरुवात
  • पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेकडे ७७ धावांची आघाडी
  • कगिसो रबाडाने दूर केला मोहम्मद शमीचा अडसर, भारताचा पहिला डाव २०९ धावांमध्ये आटोपला
  • भारताने ओलांडला २०० धावांचा टप्पा
  • पांड्याच्या पहिल्या डाव्यात ९३ धावा, भारताचा डाव सावरण्यात पांड्याचा महत्वाचा वाटा
  • कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्या माघारी, भारताला नववा धक्का
  • भारताला आठवा धक्का, भुवनेश्वर कुमार- हार्दिक पांड्यामध्ये ९९ धावांची भागीदारी
  • मात्र मॉर्ने मॉर्कलच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या नादात भुवनेश्वर कुमार माघारी
  • चहापानानंतर दोनही फलंदाजांकडून भारतीय डावाची सावध सुरुवात
  • चहापानासाठी पंचांनी खेळ थांबवला, भारताची धावसंख्या १८५/७
  • भारताने ओलांडला १५० धावांचा टप्पा, हार्दिक पांड्या शतकाच्या जवळ
  • पांड्या-भुवनेश्वर कुमारची शतकी भागीदारीकडे वाटचाल
  • हार्दिक पांड्याचं झुंजार अर्धशतक, भारताच्या शेवटच्या फळीचं आफ्रिकेला चोख प्रत्युत्तर
  • भुवनेश्वर कुमारचीही पांड्याला उत्तम साथ, भारताने ओलांडला १०० धावांचा टप्पा
  • मॉर्कल, फिलँडर, रबाडा, स्टेनच्या गोलंदाजीवर पांड्याची मैदानात चौफेर फटकेबाजी
  • हार्दिक पांड्याने भुवनेश्वर कुमारच्या मदतीने भारताचा डाव सावरला
  • ठराविक अंतराने वृद्धीमान साहा माघारी, भारताला सातवा धक्का
  • भारताला सहावा धक्का, वर्नेन फिलँडरच्या गोलंदाजीवर रविचंद्रन आश्विन माघारी
  • भारताने फॉलोऑनची नामुष्की टाळली, मात्र संघाची अवस्था बिकट
  • खेळपट्टीवर जम बसवलेला चेतेश्वर पुजारा माघारी, भारताचा निम्मा संघ माघारी
  • पहिल्या सत्रानंतरच्या, पहिल्याच चेंडूवर भारताला मोठा धक्का
  • दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत भारताची धावसंख्या ७६/४
  • चेतेश्वर पुजाराची एका बाजूने झुंज सुरुच, रविचंद्रन आश्विनची पुजाराला मोलाची साथ
  • मात्र कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा माघारी, भारताला चौथा धक्का
  • दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ३० धावांची छोटी भागीदारी, भारताने ओलांडला ५० धावांचा टप्पा
  • रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • पहिल्या दिवसाअखेर भारताची धावसंख्या २८/३