कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन यांच्यातील विजयी भागीदारीच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन-डे मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर ९ गडी राखून विजय मिळवला. आफ्रिकेने दिलेले ११८ धावांचे लक्ष्य भारतीय कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवनने सहजरित्या पार केले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी झाली. त्याआधी भारतीय सलामीवीरांनी डावाची सुरुवात अतिशय आक्रमक पद्धतीने केली होती. मात्र रोहित शर्मा मोठा फटका खेळण्याच्या नादात रबाडाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यानंतर मैदानात विराट कोहली आल्यानंतर विराट- शिखरने भारताचा विजय सोपा केला. दक्षिण आफ्रिकेची टीम फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण या तीनही प्रकारात सपशेल अपयशी ठरली. आफ्रिकेच्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळे गोलंदाजांकडे सामना वाचवण्यासाठी फारसे काही उरले नाही. या विजयासह भारताने ६ वन-डे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

कर्णधार विराट कोहलीच्या टीमने दक्षिण आफ्रेकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. डर्बनचा पहिला सामना जिंकून सहा सामन्यांच्या या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. ही आघाडी आजही कायम ठेवण्याचा टीम इंडियाने यशस्वी प्रयत्न केला. या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा दाणादाण उडाली. पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांचेच वचर्स्व दिसून आले. फिरकी माऱ्यापुढे खेळताना आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्याचे पहायला मिळाले.  युझवेंद्र चहल वनडे सामन्यात सेंच्युरियन मैदानात ५ विकेट घेणारा पहिला खेळाडू ठरला. हशीम आमला, डेव्हिड मिलर आणि क्विंटन डी कॉकसारखे फलंदाज स्वस्तात परतल्यानंतर जेपी ड्युमिनीने सामना सावरण्याचा एक हाती प्रयत्न केला खरा पणत्यालाही फारसे यश मिळाले नाही. कुलदीपने तीन. भुवनेश्वर आणि बुमराहने प्रत्येकी एक बळी घेतला. आफ्रिकेच्या सात फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. ३२.२ षटकांत दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ११८ धावांत संपुष्टात आला.

या सामन्यात सुरुवातीपासूनच भारताचे पारडे जड होते. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसीला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. याआधी एबी डिव्हिलियर्सलाही बोटाच्या दुखापतीमुळे तीन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. या दोन मुख्य खेळाडूंची गैरहजेरी दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात जाणवेल यात काही शंका नाही. कर्णधार फाफ ड्यू प्लेसीएवजी संघाच्या कर्णधारपदाची धुरा एडिन मार्करमकडे आहे. दुसऱ्या सामन्यासाठी फरहान बेहरदीनला संघात स्थान देण्यात आले असून शिवाय डिव्हिलियर्सच्या जागी हेइनरिक क्लासेनचा संघात समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेची धुरा आता हाशिम आमला, जेपी ड्युमिनी, डेव्हिड मिलर आणि क्विंटन डी कॉक यांच्या खांद्यावर आहे.

लाइव्ह अपडेटः

  • भारताने ९ गडी राखून एकहाती जिंकली दुसरी वन-डे
  • भारताला जिंकण्यासाठी फक्त २ धावांची गरज
  • शिखर धवनचे अर्धशतक
  • धवन- कोहलीची ५५ चेंडूमध्ये ५० धावांची भागीदारी
  • धवन- कोहलीची फटकेबाजी सुरूच
  • भारताला जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी ६३ धावांची गरज
  • भारताला पहिला धक्का, मॉर्केलने पकडला रोहित शर्माचा झेल
  • रबाडाच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा माघारी
  • रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीकडून भारतीय डावाची आक्रमक सुरुवात
  • भारतीय फिरकीसमोर आफ्रिकेची दाणादाण; भारताला जिंकण्यासाठी ११९ धावांचे आव्हान
  • वनडेत सेंच्युरियन मैदानात ५ विकेट घेणारा पहिला खेळाडू ठरला युझवेंद्र चेहल
  •  इम्रान ताहिर त्रिफळाचीत, जसम्रीत बुमराहने घेतली विकेट
  • इम्रान ताहिर मैदानात
  • मॉर्केल आऊट, आफ्रिकेचा आठवा गडी माघारी
  • चेहलने उडवली आफ्रिकेची दाणादाण
  • आफ्रिकेचा सातवा गडी माघारी, राबाडाने केली निराशा
  • दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का; डिपी ड्युमिनी तंबुत परतला
  • युझवेंद्र चेहल, कुलदीप यादव यांना प्रक्येकी दोन विकेट
  • २५ धावा करुन झोंडो तंबूत परतला
  • १९ ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिका ७२/४
  • खाया झोंडोचा कुलदीप यादवला चौकार
  • ड्युमिनिकडून डाव सावरण्याचा प्रयत्न, दक्षिण आफ्रिका ५३/४
  • गोलंदाजीत कुलदीप चमकला, दक्षिण आक्रिकेचा डेव्हिड मिलर शुन्यावर बाद
  • दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का, कुलदीपच्या भेदक माऱ्यावर मार्करम बाद
  • दक्षिण आफ्रिकेचा दुसरा गडी बाद, क्विंटन डीकॉकही तंबूत परतला
  • हाशिम आमलाचा अडसर दूर करण्यात भारताला यश ३२ चेंडूत २३ धावा केल्या
  • हार्दिक पांड्याचा भेदक मारा