जोहान्सबर्गच्या उसळत्या खेळपट्टीने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील अखेरच्या कसोटीचा तिसऱ्या दिवसाचा खेळ नियोजीत वेळेच्या काही मिनीटं आधी थांबवावा लागला. भारताने दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २४१ धावांचं आव्हान दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्क्रम यष्टीरक्षक पार्थिव पटेलकडे झेल देत माघारी परतला. मात्र यानंतर काही षटकांमध्येच जसप्रीत बुमराहच्या उसळत्या चेंडूचा फटका डीन एल्गरच्या हेल्मेटला बसला. यानंतर खेळपट्टी खेळण्यायोग्य नसल्याचं कारण देत आफ्रिकन खेळाडूंनी उरलेली षटकं खेळण्यास नकार दिला. यानंतर दोन्ही पंचांनी सामनाधिकारी आणि कर्णधारांशी चर्चा करुन तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.

याआधी दुसऱ्या डावात भारताने अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या फटकेबाजीमुळे आफ्रिकेपुढे मोठ्या धावसंख्येचं आव्हान उभारलं. दुर्दैवाने अजिंक्य रहाणेला दुसऱ्या डावात आपलं अर्धशतक पूर्ण करता आलं नाही, मात्र भुवनेश्वर कुमारसोबत त्याने अर्धशतकी भागीदारी रचत भारताला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. त्यामुळे दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावलेली असल्यामुळे, उद्याच्या दिवसात गोलंदाज कसा खेळ करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

  • तिसऱ्या दिवसाचा खेळ संपताना दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या १७/१
  • आफ्रिकन खेळाडूंच्या वर्तनावर विराट कोहली आणि समालोचक नाराज
  • सामनाधिकारी आणि दोन्ही पंचांनी कर्णधारांशी स्वतंत्र चर्चा करुन खेळ थांबवला
  • दक्षिण आफ्रिकन खेळाडूंकडून खेळपट्टीच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित
  • जसप्रीत बुमराहचा उसळता चेंडू डीन एल्गरच्या हेल्मेटवर आदळला
  • दक्षिण अफ्रिकेला पहिला धक्का, मार्क्रम ४ धावांवर आऊट
  • दक्षिण अफ्रिकेचा डाव सुरु
  • भारताचा दुसरा डाव २४७ धावांमध्ये आटोपला
  • भारताकडे २४० धावांची आघाडी, भारताचा अखेरचा गडी माघारी
  • भुवनेश्वर कुमार ३३ धावांवर आऊट, भारताचा नववा गडी बाद
  • मोहम्मद शमी २७ धावांवर आऊट, भारताचे ८ गडी माघारी
  • शमीने झळकवले दोन षटकार, भारताकडे २०६ धावांची आघाडी
  • अजिंक्य रहाणे ४८ धावांवर आऊट, भारताला सातवा धक्का
  • चहापानापर्यंत भारताची आघाडी १९२ धावांची
  • तिसऱ्या दिवशीच्या चहापानाच्या सत्राची घोषणा, भारताची धावसंख्या १९९/६
  • भारताकडे भरभक्कम आघाडी, अजिंक्य रहाणे जुन्या लयीत परतला
  • भुवनेश्वर कुमार आणि अजिंक्य रहाणेमध्ये अर्धशतकी भागीदारी
  • हार्दिक पांड्या माघारी, भारताचा सहावा गडी माघारी
  • भारताचा निम्मा संघ माघारी
  • मात्र कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर कर्णधार विराट कोहली माघारी
  • अजिंक्य रहाणेची मॉर्ने मॉर्कलच्या गोलंदाजीवर चांगली फटकेबाजी
  • अजिंक्य रहाणे-विराट कोहलीकडून डाव सावरण्याचा प्रयत्न
  • पहिल्या सत्राची घोषणा, भारताची धावसंख्या १००/४, आघाडी ९३ धावांची
  • अखेर कगिसो रबाडाने मुरली विजयचा अडसर दूर केला, भारताचा चौथा गडी माघारी
  • दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी, भारताने गाठला १०० धावसंख्येचा टप्पा
  • मुरली विजय – विराट कोहलीने भारतीय संघाचा डाव सावरला
  • भारताचा तिसरा गडी माघारी, आघाडी ५० धावांच्या पुढे
  • ठराविक अंतराने चेतेश्वर पुजाराही माघारी, मॉर्ने मॉर्कलच्या गोलंदाजीवर डु प्लेसिसने पकडला झेल
  • लोकेश राहुल वर्नेन फिलँडरच्या गोलंदाजीवर डु प्लेसिसकडे झेल देत माघारी, भारताला दुसरा धक्का
  • तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात