News Flash

पहिल्या दिवसाच्या खेळावर दक्षिण आफ्रिकेचं वर्चस्व, भारताकडून कोहली-पुजाराची झुंज

आफ्रिकेचा एक गडी माघारी

भारतीय संघाची विकेट घेतल्यानंतर आनंद व्यक्त करताना वर्नेन फिलँडर आणि आफ्रिकेचा संघ

कगिसो रबाडा, वर्नेन फिलँडर आणि अन्य आफ्रिकन गोलंदाजांच्या जलद माऱ्यासमोत भारतीय संघ तिसऱ्या कसोटीत पुन्हा एकदा कोलमडला. केप टाऊन आणि सेंच्युरिअन कसोटी पाठोपाठ जोहान्सबर्ग कसोटीतही भारताचा पहिला डाव १८७ धावांमध्ये आटोपला. भारताकडून पहिल्या डावाता कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांनी संयमी अर्धशतकी खेळी करुन भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ठराविक अंतराने विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा माघारी परतल्यानंतर भारतीय डावाची पुन्हा एकदा घसरगुंडी उडाली. अखेरच्या फळीत भुवनेश्वर कुमारने फटकेबाजी करत धावसंख्येत भर टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर फलंदाजांकडून त्याला हवीतशी मदत मिळाली नाही. अखेर भारताचा पहिला डाव १८७ धावांमध्ये आटोपला.

भारताकडून अजिंक्य रहाणे, मुरली विजय, लोकेश राहुल यासह अन्य फलंदाजांनी चांगलीच निराशा केली. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने सर्वाधित ३ बळी मिळवले. तर मॉर्ने मॉर्कल, वर्नेन फिलँडर आणि फेलुक्वायोने प्रत्येकी २-२ बळी मिळवले. तर लुंगी निगडीने एक बळी मिळवला. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवातही अडखळती झाली. सलामीवीर एडन मार्क्रम भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक पार्थिव पटेलकडे झेल देत माघारी परतला. यानंतर नाईट वॉचमन कगिसो रबाडा आणि डीन एल्गर यांनी आफ्रिकेची पुढचा डाव सावरला. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या खेळात आफ्रिकेचा उरलेला संघ लवकरात लवकर माघारी धाडण्याचं मोठं आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.

 • अखेर पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ थांबवला, दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ६/१
 • भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर पार्थिव पटेलकडे सोपवला झेल
 • दक्षिण आफ्रिकेच्या डावाचीही अडखळती सुरुवात, एडन मार्क्रम माघारी
 • भारताचा पहिला डाव १८७ धावांमध्ये आटोपला, कगिसो रबाडाला ३ बळी
 • अखेर भारताचा शेवटचा गडी माघारी, भुवनेश्वर कुमार झेलबाद
 • अखरेच्या फळीत भुवनेश्वर कुमारकडून फटकेबाजी
 • पाठोपाठ इशांत शर्माही भोपळा न फोडता माघारी, भारताचे ९ गडी माघारी
 • मोहम्मद शमी फटकेबाजी करण्याच्या नादात माघारी, भारताला आठवा धक्का
 • क्विंटन डी कॉकचे आतापर्यंत यष्टीमागे ५ बळी
 • भारताने ओलांडला १५० धावांचा टप्पा
 • भारताचा सातवा गडी माघारी
 • भारतीय डावाची घसरगुंडी सुरुच, मोठा फटका खेळण्याच्या नादात हार्दिक पांड्या बाद
 • ठराविक अंतराने पार्थिव पटेल मॉर्ने मॉर्कलच्या गोलंदाजीवर माघारी, भारताचे ६ गडी माघारी
 • भारताचा निम्मा संघ माघारी
 • चेतेश्वर पुजारा माघारी, अर्धशतक झळकावून पुजारा बाद
 • पार्थिव पटेल-चेतेश्वर पुजाराकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
 • भारताची धावसंख्या ११४/४, पुजारा खेळपट्टीवर कायम
 • पहिल्या दिवशीच्या खेळात चहापानासाठी खेळ थांबवला
 • मात्र मॉर्केलच्या गोलंदाजीवर रहाणे पायचीत होऊन माघारी, भारताला चौथा धक्का
 • अजिंक्य रहाणेला फिलँडरच्या गोलंदाजीवर जीवदान
 • अजिंक्य रहाणे – चेतेश्वर पुजाराकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
 • अजिंक्य रहाणे खेळपट्टीवर, भारताने ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा
 • निगडीच्या गोलंदाजीवर डिव्हीलियर्सकडे झेल देत विराट कोहली माघारी, भारताला तिसरा धक्का
 • भारताची जमलेली जोडी फोडण्यात आफ्रिकेला यश
 • तिसऱ्या विकेटसाठी पुजारा आणि विराट कोहलीमध्ये ८४ धावांची भागीदारी
 • कर्णधार विराट कोहलीचं संयमी अर्धशतक
 • भारताने ओलांडला ५० धावांचा टप्पा
 • पहिल्या सत्रापर्यंत भारताची धावसंख्या ४५/२
 • मात्र विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने भारताचा डाव सावरला
 • चेतेश्वर पुजाराने ५० चेंडू खेळले, मात्र खातं उघडण्यास अपयश
 • कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर मुरली विजय डी कॉककडे झेल देत बाद, भारताला दुसरा धक्का
 • सलामीवीर लोकेश राहुल वर्नेन फिलँडरच्या गोलंदाजीवर झेल देत माघारी, भारताला पहिला धक्का
 • प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची अडखळती सुरुवात
 • रोहित शर्मा, रविचंद्रन आश्विनला संघात स्थान नाही, अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वरचं पुनरागमन
 • तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 2:03 pm

Web Title: india tour of south africa 2018 3rd test ind vs sa johannesburg day 1 live updates
Next Stories
1 संघातील खेळाडूंनी विराटला त्याच्या चुका दाखवून द्यायला पाहिजेत- सेहवाग
2 अंडर १९ वर्ल्डकप: पाक सेमीफायनलमध्ये, भारताशी भिडणार?
3 इंग्लंडमध्ये धावा काढल्या तरच विराट कोहलीला सर्वोत्तम मानता येईल – मायकल होल्डींग
Just Now!
X