News Flash

आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, सुरेश रैनाचं संघात पुनरागमन

अजिंक्य रहाणेला संघात जागा नाही

सुरेश रैनाचं भारतीय संघात पुनरागमन

जोहान्सबर्ग कसोटी मालिका ६३ धावांनी जिंकल्यानंतर बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. वन-डे मालिकेनंतर भारतीय संघ आफ्रिकेविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. १६ जणांच्या भारतीय संघांमध्ये सुरेश रैनाने पुनरागमन केलं आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत केलेली चांगली कामगिरी त्यांच्या पुनरागमनासाठी महत्वाचं कारण ठरलेली आहे.

अवश्य वाचा – मालिकेचा अखेर विजयाने, जोहान्सबर्ग कसोटीत भारत ६३ धावांनी विजयी

वर्षभरापूर्वी सुरेश रैना फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळला होता. यानंतर जवळपास वर्षभर सुरेश रैना भारतीय संघाच्या बाहेर होता. याव्यतिरीक्त शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट यांनाही टी-२० संघात जागा मिळाली आहे. महेंद्रसिंह धोनीवर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आलेली असून दिनेश कार्तिकला राखिव यष्टीरक्षक म्हणून संघात जागा मिळालेली आहे.

टी-२० मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, मनिष पांडे, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट आणि शार्दुल ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 1:58 pm

Web Title: india tour of south africa 2018 bcci announced t 20 squad against india suresh raina makes comeback
Next Stories
1 IPL 2018: अफगाणिस्तानच्या १७ वर्षीय मुजीबला मिळाले तब्बल ४ कोटी
2 IPL 2018 : गौतम गंभीर दिल्ली डेअरडेविल्सचा कर्णधार असेल – रिकी पाँटींग
3 IPL AUCTION 2018 – अखेरच्या फेरीत ख्रिस गेलवर पंजाबकडून बोली, जयदेव उनाडकट ठरला सर्वात महागडा भारतीय खेळाडू
Just Now!
X