रविचंद्रन आश्विनची फिरकी आणि शेवटच्या सत्रात भारतीय क्षेत्ररक्षकांच्या चपळाईमुळे भारतीय संघाने सेंच्युरिअन कसोटीत दमदारपणे पुनरागमन केलं आहे. अखेरच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेचे दोन फलंदाज भारतीय क्षेत्ररक्षकांच्या सजगतेमुळे धावपळ झाले, त्यातच जलदगती गोलंदाज अपयशी ठरत असताना रविचंद्रन आश्विनने आपली चांगली कमाल दाखवली. पहिल्या दिवसाच्या खेळात आश्विनने आफ्रिकेच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं. पहिल्या दोन सत्रांपर्यंत दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला भारताच्या या पुनरागमनाचा चांगलाच धक्का बसला.

त्याआधी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत आपल्या डावाची अतिशय भक्कमपणे सुरुवात केली. सलामीवीर डीन एल्गर आणि एडन मार्क्रम या जोडीने पहिलं सत्र खेळून काढत भारतीय गोलंदाजांच्या चांगलेच नाकीनऊ आणले. मात्र दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेला धक्के देत सामन्यात परतण्याची सुरुवात केली. आफ्रिकेकडून सलामीवीर एडन मार्क्रम आणि तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या हाशिम आमलाने चांगली फलंदाजी केली. मात्र दोघांनाही शतकाने हुलकावणी दिली. अखेर पहिल्या दिवसाचा खेळ संपताना दक्षिण आफ्रिकेने ६ गड्यांच्या मोबदल्यात २६९ धावांपर्यंत मजल मारली.

  • पहिल्या दिवसाचा खेळ संपताना दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या २६९/
  • केशव महाराज – फाफ डु प्लेसीस जोडीने आफ्रिकेची पडझड थांबवली
  • दक्षिण आफ्रिकेचा सहावा गडी माघारी
  • आफ्रिकेची घसरगुंडी सुरुच, वर्नेन फिलँडर चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद
  • पाठोपाठ रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर क्विंटन डी कॉक झेलबाद, आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी
  • मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात हाशिम आमला माघारी, आफ्रिकेला चौथा धक्का
  • हाशिम आमला- फाफ डु प्लेसिस जोडीकडून पुन्हा एकदा आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • सलग ३ अर्धशतकी भागीदाऱ्यांमुळे आफ्रिकेने ओलांडला २०० धावांचा टप्पा
  • अमला – डिव्हीलियर्समध्या तिसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी, हाशिम आमलाचं अर्धशतक
  • आफ्रिकेची जमलेली जोडी फोडण्यात भारताला यश, इशांत शर्माच्या गोलंदाजीवर एबी डिव्हीलियर्स माघारी
  • आमला – डिव्हीलियर्सच्या फटकेबाजीमुळे आफ्रिकेची २०० धावसंख्येकडे वाटचाल
  • चहापानानंतर आफ्रिकेची आक्रमक सुरुवात
  • एडन मार्क्रमचं शतक हुकलं, आश्विनच्या गोलंदाजीवर मार्क्रम ९४ धावांवर माघारी
  • दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी, आफ्रिकेला दुसरा धक्का
  • मार्क्रमची मैदानात चौफेर फटकेबाजी, आफ्रिकेचा सलामीवीर शतकाच्या जवळ
  • एडन मार्क्रम-हाशिम आमला जोडीकडून धावांची बरसात सुरुच
  • दरम्यान सलामीवीर एडन मार्क्रमचं अर्धशतक
  • मुरली विजयकडे झेल देत एल्गर माघारी, मोठ्या कालावधीनंतर भारताला पहिलं यश
  • पहिल्या सत्रानंतर भारताला पहिलं यश, डीन एल्गर माघारी
  • भारतीय गोलंदाजांना पहिल्या सत्रात एकही बळी नाही
  • सेंच्युरिअन कसोटीच्या पहिल्या दिवसाचं पहिलं सत्र संपलं, दक्षिण आफ्रिका बिनबाद ७८
  • दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
  • एल्गर-मार्क्रम जोडीचा सावध खेळ, खराब चेंडूवर चौफेर फटकेबाजी
  • मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह यांपैकी एकाही गोलंदाजाला यश नाही
  • डीन एल्गर आणि एडन मार्क्रम जोडीकडून आफ्रिकेच्या डावाची सावध सुरुवात
  • दुसऱ्या कसोटीतही अजिंक्य रहाणेला संघात जागा नाहीच, पार्थिव-लोकेश राहुल-इशांत शर्माला संघात जागा
  • नाणेफेक जिंकून आफ्रिकन कर्णधार डु प्लेसिसचा फलंदाजी करण्याचा निर्णय