पहिल्या कसोटीत आपल्या भेदक माऱ्याने भारताला पराभूत करण्याच महत्वाचा वाटा उचलणाऱ्या कगिसो रबाडाला नव-वर्षाची भेट मिळाली आहे. कसोटी गोलंदाजांच्या यादीत कगिसो रबाडाने पहिलं स्थान पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेत अखेरची कसोटी जिंकल्यानंतर आणि दक्षिण आफ्रिकेने केप टाऊन कसोटीत भारतावर मात केल्यानंतर आयसीसीने नुकतीच ताजी क्रमवारी जाहीर केली. यावेळी इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला मागे टाकत रबाडाने पहिलं स्थान पटकावलं आहे. केप टाऊन कसोटीत रबाडाच्या नावावर ५ बळी जमा आहेत.

अवश्य वाचा – टाचेच्या दुखापतीमुळे डेल स्टेनची भारताविरुद्ध मालिकेतून माघार

“जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान पटकावणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. वर्षाच्या सुरुवातीला हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक गोलंदाज मैदानात उतरत असतो. भारताविरुद्ध कसोटीनंतर मला हा बहुमान मिळाल्यामुळे माझ्यासाठी हा पहिला क्रमांक खास आहे. माझ्या या यशात माझ्या सहकाऱ्यांचाही तितकाच महत्वाचा वाटा असल्याचं”, कगिसो रबाडाने मान्य केलं.

अवश्य वाचा – …म्हणून पहिल्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणेला वगळलं – विराट कोहली

एकीकडे दक्षिण आफ्रिकेच्या गोटात आनंदाचं वातावरण असलं तरीही भारताच्या गोटात सारंकाही आलबेल नसल्याचं दिसून येतंय. कसोटी फलंदाजांच्या यादीत विराटच्या स्थानात एका अंकाची घसरण झाली असून तो तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने या यादीत दुसरं, तर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथने पहिलं स्थान पटकावलेलं आहे. विराट कोहलीव्यतिरीक्त चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीतही घसरण झालेली आहे. पुजारा तिसऱ्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर घसरला आहे.

आयसीसीची कसोटी गोलंदाजांसाठी जागतिक क्रमवारी –

१) कगिसो रबाडा – दक्षिण आफ्रिका
२) जेम्स अँडरसन – इंग्लंड
३) रविंद्र जाडेजा – भारत
४) रविचंद्रन आश्विन – भारत
५) जोश हेजलवूड – ऑस्ट्रेलिया
६) वर्नेन फिलँडर – दक्षिण आफ्रिका
७) रंगना हेरथ – ऑस्ट्रेलिया
८) निल वेंगर – न्यूझीलंड
९) मिचेल स्टार्क – ऑस्ट्रेलिया
१०) नॅथन लॉयन – ऑस्ट्रेलिया

आयसीसीची कसोटी पलंदाजांसाठी जागतिक क्रमवारी –

१) स्टिव्ह स्मिथ – ऑस्ट्रेलिया
२) जो रुट – इंग्लंड
३) विराट कोहली – भारत
४) केन विलियमसन – न्यूझीलंड
५) चेतेश्वर पुजारा – भारत
६) डेव्हिड वॉर्नर – ऑस्ट्रेलिया
७) अझर अली – पाकिस्तान
८) दिनेश चंडीमल – श्रीलंका
९) अॅलिस्टर कूक – इंग्लंड
१०) हाशिम आमला – दक्षिण आफ्रिका