News Flash

विराटसोबत चोरटी धाव घेताना शिखर धवन बाद, ट्विटरवर हास्यकल्लोळ

पहिल्या सामन्यात भारत विजयी

पहिल्या सामन्यात शिखर धवन बाद झाला तो क्षण

डरबन वन-डे सामन्यात भारताने विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या शतकी भागीदारीच्या जोरावर विजय संपादन केला. मात्र या सामन्यात सलामीवीर शिखर धवन मैदानात असताना, विराट कोहलीसोबत चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नान शिखर धावबाद झाला. आपली विकेट गेल्यानंतर नाराज झालेल्या शिखर धवनने भर मैदानात विराटजवळ आपली नाराजी व्यक्त करत आपला असंतोष व्यक्त केला.

भारतीय डावाच्या १३ व्या षटकात ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर हा प्रकार घडला. एडन मार्क्रमच्या अचुक फेकीवर धाव शिखर धवन धावबाद होऊन माघारी परतला. वास्तविक पाहता ही धाव घेण्यासाठी शिखर धवन उत्सुक नव्हता. मात्र कर्णधार विराट कोहलीने धाव घेतल्यामुळे त्याला ही धाव घ्यावी लागली. मात्र तोपर्यंत मार्क्रमच्या अचुक फेकीने धवनचा परतीचा प्रवास ठरला होता. या प्रकारानंतर मैदानात भारतीय चाहत्यांनी गब्बरचा अँग्री यंगमॅन अवतार पाहिला.

या विकेटनंतर ट्विटरवरही लोकांनी शिखर धवनची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 8:20 am

Web Title: india tour of south africa 2018 people make fun of goof up between virat and shikhar at 1st odi which cost dhawans wicket
Next Stories
1 मेरी कोमची सोनेरी कामगिरी
2 ‘साइ’च्या निधीत ६६.१७ कोटी रुपये कपात!
3 विश्वविजयाच्या चौकारासाठी भारत सज्ज
Just Now!
X