News Flash

सामना जिंकूनही दक्षिण आफ्रिकेवर सामनाधिकाऱ्यांची कारवाई

षटकांची गती न राखल्याने कारवाई

आफ्रिकन कर्णधाराच्या मानधनातली २० टक्के रक्कम कापली

जोहान्सबर्ग वन-डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ५ गडी राखून मात केली. डकवर्थ लुईस नियमानुसार आफ्रिकेसमोर २८ षटकात २०२ धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं. हे आव्हान आफ्रिकेने पूर्ण करत भारताचा मालिका विजय लांबवला. मात्र या विजयानंतर आफ्रिकेच्या संघाला सामनाधिकाऱ्यांच्या दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागलेलं आहे.

अवश्य वाचा – आम्ही सामना जिंकण्याच्या योग्यतेचा खेळ केला नाही – विराट कोहली

चौथ्या वन-डे सामन्यात षटकांची गती न राखल्याप्रकरणी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी आफ्रिकेला शिक्षा सुनावली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार आफ्रिकेच्या संघातील खेळाडूंच्या मानधनातली १० टक्के रक्कम कापून घेण्यात आलेली आहे. कर्णधार एडन मार्क्रम याच्या मानधनातली मात्र दुप्पट रक्कम शिक्षा म्हणून कापून घेण्यात येणार आहे. सामनाधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीमध्ये आफ्रिकन कर्णधार एडन मार्क्रम याने आपली चूक मान्य केली आहे.

अवश्य वाचा – आफ्रिकेविरुद्ध चौथ्या वन-डे सामन्यात झालेले १२ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2018 4:30 pm

Web Title: india tour of south africa 2018 south africa fined for slow over rate in fourth odi
Next Stories
1 आम्ही सामना जिंकण्याच्या योग्यतेचा खेळ केला नाही – विराट कोहली
2 ….म्हणून आम्ही सामना गमावला – शिखर धवन
3 आफ्रिकेविरुद्ध चौथ्या वन-डे सामन्यात झालेले १२ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?
Just Now!
X