कर्णधार विराट कोहलीच्या ३० व्या शतकाच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यातही श्रीलंकेवर ६ गडी राखून मात केली. या विजयासह भारताने वन-डे सामन्यांची मालिका ५-० अशा फरकाने जिंकली आहे. कसोटी मालिकेपाठोपाठ श्रीलंकेला भारताने वन-डे मालिकेतही व्हाईट वॉश दिलेला आहे. कर्णधार कोहलीने संयमी खेळी करत ११० धावांची खेळी केली. केदार जाधवनेही ६३ धावा काढून त्याला चांगली साथ दिली. सामना जिंकण्यासाठी २ धावा हव्या असताना केदार जाधव डिसील्वाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

त्याआधी दोन्ही सलामीवीर झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि मनिष पांडे यांनी भारताचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी तब्बल ९९ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताने श्रीलंकेला पुन्हा एकदा बॅकफूटवर ढकललं. विराट कोहलीने यादरम्यान अर्धशतकी खेळी करत लंकेच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. दुसऱ्या बाजूने मनीष पांडेनेही कोहलीला चांगली साथ दिली. मात्र मनीष पांडेला बाद करत पुष्पकुमाराने भारताला तिसरा धक्का दिला.

शिखर धवनच्या जागी संघात जागा मिळालेल्या अजिंक्य रहाणेला अखेरच्या सामन्यात आपली छाप पाडता आलेली नाहीये. लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणे अवघ्या ५ धावा काढून माघारी परतला आहे. लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीवर एकदा अजिंक्य रहाणेला जीवदान मिळालं मात्र त्यानंतर मलिंगानेच आपल्या गोलंदाजीवर रहाणेला माघारी पाठवलं. पाठोपाठ विश्वा फर्नांडोच्या गोलंदाजीवर रोहीत शर्माही बाद झाल्याने भारताला ‘दुहेरी’ धक्का बसला आहे.

श्रीलंकेकडून लसिथ मलिंगा, विश्वा फर्नांडो आणि मलिंदा पुष्पकुमारा आणि डिसील्वा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. मात्र सलामीच्या दोन फलंदाजांना माघारी धाडल्यानंतर भारतावर दडपण तयार करण्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना अपयश आलं.

त्याआधी अखेरच्या वन-डे सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर २३९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. अखरेच्या फलंदाजांनी केलेल्या हाणामारीमुळे श्रीलंकेने सामन्यात सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे. पहिल्या चार सामन्यांच्या तुलनेत अखेरच्या सामन्यात लंकेने भारताला चांगलीच टक्कर दिली. त्यामुळे आता भारताचे फलंदाज श्रीलंकेने दिलेलं हे आव्हान कसं पार पाडतात हे पहावं लागणार आहे.

पहिले ३ फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर लहिरु थिरीमने आणि अँजलो मॅथ्यूज यांनी चौथ्या विकेटसाठी १२२ धावांची शतकी भागीदारी केली. मात्र भुवनेश्वर कुमारने लहिरु थिरीमनेचा त्रिफळा उडवत श्रीलंकेला चौथा धक्का दिला. यानंतर काही वेळातच कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर अँजलो मॅथ्यूज महेंद्रसिंह धोनीकडे झेल देत माघारी परतला. यामुळे सुरुवातीच्या धक्क्यानंतर सावरलेल्या श्रीलंकेच्या संघाचे ५ गडी माघारी परतले. मात्र यादरम्यान लहिरु थिरीमने आणि अँजलो मॅथ्यूजने लंकेचा डाव सावरत संघाला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली.  लहिरु थिरीमनने आपलं अर्धशतक साजरं केलं. त्याला अँजलो मॅथ्यूजने अर्धशतक झळकावत उत्तम साथ दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे सलामीचे ३ फलंदाज माघारी परतलेले असताना या दोन्ही फलंदाजांनी संघाचा धावफलक हालता ठेवला. थिरीमनने भारताच्या फिरकी गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला. या दोघांनीही चौथ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी झाली.

श्रीलंकेने दोनशे धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर आणखी एक खेळाडू धावबाद झाला. यानंतर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर अकिला धनंजया यष्टीचीत होऊन माघारी परतला. यादरम्यान महेंद्रसिंह धोनीने वन-डे सामन्यांमध्ये सर्वाधीक यष्टीचीत करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. धोनीने आतापर्यंत १०० यष्टीचीत केले आहेत. यानंतर एकामागोमाक एक विकेट जाण्याचं सत्र सुरुच राहिल्याने अवघ्या काही मिनीटांमध्ये लंकेचे ९ गडी माघारी परतले. श्रीलंकेच्या तळातल्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करत लंकेला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. मात्र भुवनेश्वर कुमारने अखेरच्या षटकात लसिथ मलिंगाला बाद करत श्रीलंकेचा डाव २३८ धावांवर संपवला.

त्याआधी भारताविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या श्रीलंकेची सुरुवात नेहमीप्रमाणे खराब झालेली आहे. सलामीवीर निरोशन डिकवेलाला भुवनेश्वर कुमारने आपल्या गोलंदाजीवर झेल घेत माघारी धाडलं . यापाठोपाठ दिलशान मुनवीराही भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. विराट कोहलीने मुनवीराचा सुरेख झेल घेतला. यादरम्यान श्रीलंकेच्या फलंदाजाकडून एकही मोठी भागीदारी झालेली पहायला मिळाली नाही. कर्णधार उपुल थरंगाने काही सुंदर फटके लगावले, मात्र जसप्रीत बुमराहने त्याला धोनीकडे झेल द्यायला भाग पाडत श्रीलंकेला तिसरा धक्का दिला.

भारताकडून आतापर्यंत भुवनेश्वर कुमारने ५ विकेट घेतल्या. त्याला जसप्रीत बुमराहने २ तर युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.  तर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १ विकेट घेतली आहे. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर मात्र आज श्रीलंकेच्या फलंदाजांनी चांगल्या धावा कुटल्या. मात्र इतर गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना वेळीच वेसण घातली.

  • अखेरच्या सामन्यात भारताची लंकेवर ६ गडी राखून मात, मालिकाही ५-० ने खिशात
  • विजयासाठी आवश्यक असलेली धाव काढून कोहलीने भारताला सामना जिंकवून दिला
  • दुसऱ्या बाजूने केदार जाधवचं अर्धशतक, २ धावा शिल्लक असताना केदार जाधव माघारी
  • केदार जाधवची कोहलीला उत्तम साथ, विराट कोहलीचं शतक
  • केदार जाधव आणि कोहलीने पुन्हा भारताचा डाव सावरला, दोघांमध्येही १०९ धावांची भागीदारी
  • मनीष पांडेला बाद करत पुष्पकुमाराचा भारताला तिसरा धक्का
  • कोहली आणि मनीष पांडेमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी
  • कोहली आणि मनीष पांडेने भारताचा डाव सावरला, विराट कोहलीचं अर्धशतक
  • पाठोपाठ विश्वा फर्नांडोच्या गोलंदाजीवर रोहीत शर्मा माघारी, भारताचे सलामीवीर माघारी
  • भारताच्या डावाची खराब सुरुवात, अजिंक्य रहाणे माघारी, भारताला पहिला धक्का
  • भारतासमोर २३९ धावांचं आव्हान
  • मात्र मलिंगा अखेरच्या षटकात बाद करत भुवनेश्वरने लंकेचा डाव संपवला, भुवनेश्वरचे सामन्यात ५ बळी
  • अखेरच्या षटकांत तळातल्या फलंदाजांची आक्रमक फलंदाजी
  • लंकेचं विकेट जाण्याचं सत्र सुरुच, ९ गडी माघारी परतले
  • सर्वाधिक यष्टीचीत करण्याचा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर, धोनीचे वन-डे कारकिर्दीत आतापर्यंत १०० यष्टीचीत
  • पाठोपाठ चहलच्या गोलंदाजीवर अकिला धनंजया यष्टीचीत, लंकेला सातवा धक्का
  • लंकेची घसरगुंडी सुरुच, धोनीच्या समयसुचकतेमुळे आणखी एक खेळाडू धावबाद
  • पाठोपाठ कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर अँजलो मॅथ्यूज बाद, लंकेचा निम्मा संघ माघारी
  • थिरीमनेला बाद करत भुवनेश्वरने श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, लंकेचे ४ गडी माघारी
  • दोन्ही फलंदाजांमध्ये शतकी भागीदारी, श्रीलंकेने उभारली सन्मानजनक धावसंख्या
  • लहिरु थिरीमनेचं अर्धशतक, मॅथ्यूजचही झुंजार अर्धशतक
  • भारतीय गोलंदाजांवर थिरीमने, मॅथ्यूजचा हल्लाबोल, भारतीय गोलंदाज बॅकफूटवर
  • लंकेचा डाव सावरला, थिरीमने आणि मॅथ्यूजची अर्धशतकी भागीदारी
  • बुमराहचा श्रीलंकेला तिसरा धक्का, कर्णधार थरंगाला धाडलं माघारी
  • मोठी भागीदारी करण्यात लंकेच्या गोलंदाजांना अपयश
  • पाठोपाठ मुनवीराही भुवनेश्नर कुमारच्या गोलंदाजीवर बाद, लंकेला दुसरा धक्का
  • लंकेची अडखळती सुरुवात, निरोशन डिकवेला माघारी
  • श्रीलंकेकडून कर्णधार उपुल थरंगाचं पुनरागमन, भारताकडून संघात ४ बदल
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
  • पावसामुळे सामना सुरु होण्यास विलंब