04 August 2020

News Flash

दिग्गजांना माघारी टाकत ‘हा’ विक्रम आता धोनीच्या खात्यावर जमा

वन-डे सामन्यात धोनी सर्वाधीकवेळा नाबाद राहिलेला खेळाडू

महेंद्रसिंग धोनी ( संग्रहीत छायाचित्र)

आपल्या कारकिर्दीचा ३०० वा वन-डे सामना खेळत असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आज आणखी एका विक्रमाची नोंद करण्यात आलेली आहे. वन-डे सामन्यात सर्वाधीक नाबाद राहण्याचा विक्रम धोनीच्या नावे झाला आहे. धोनीने दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पोलॉक आणि श्रीलंकेच्या चमिंडा वास या खेळाडूंना मागे टाकलं आहे.

चौथ्या वन-डे सामन्यात धोनीने अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकून ४९ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे भारताने ३०० धावांची धावसंख्या ओलांडली. ३०० वा वन-डे सामना खेळणारा महेंद्रसिंह धोनी हा सहावा भारतीय खेळाडू ठरलेला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि युवराज सिंहच्या नावे हा विक्रम जमा आहे.

अवश्य वाचा – धोनीच्या जिद्दीचे एमएसके प्रसाद यांच्याकडून कौतुक

वन-डे सामन्यात सर्वाधिक वेळा नाबाद राहणाऱ्या फलंदाजांची यादी –

१) महेंद्रसिंह धोनी – ३०० सामने – ७३ वेळा नाबाद

२) शॉन पोलॉक – ३०३ सामने – ७२ वेळा नाबाद

३) चमिंडा वास – ३२२ सामने – ७२ वेळा नाबाद

४) मायकल बेवन – २३२ सामने – ६७ वेळा नाबाद

५) मुथय्या मुरलीधरन – ३५० सामने – ६३ वेळा नाबाद

६) ख्रिस हॅरिस – २५० सामने – ६२ वेळा नाबाद

७) स्टिव्ह वॉ – ३२५ सामने – ५८ वेळा नाबाद

८) अब्दुल रझ्झाक – २६५ सामने – ५७ वेळा नाबाद

९) मार्क बाऊचर – २९५ सामने – ५७ वेळा नाबाद

१०) डॅनियल व्हिटोरी – २९५ सामने – ५७ वेळा नाबाद

अवश्य वाचा – एका सेल्फीसाठी ‘त्या’ व्यक्तीने धोनीचा सराव थांबवला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2017 8:42 pm

Web Title: india tour of sri lanka 2017 ms dhoni bags record of most number of unbeaten batsman in odi cricket
टॅग Ms Dhoni
Next Stories
1 मुंबईला कमी लेखून चूक केलीत! अनुप कुमारचा हरियाणाला टोला
2 Video : ऑस्ट्रेलियावर मात केल्यानंतर बांगलादेशी वाघांचं सेलिब्रेशन
3 भारत चौथ्या सामन्यात विजयी, मालिकेत ४-० ने आघाडी
Just Now!
X