News Flash

टीम इंडियाचा श्रीलंका दौरा संकटात!

उभय संघात ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका प्रस्तावित

भारत वि. श्रीलंका

मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारताला यावर्षी जुलैमध्ये श्रीलंका दौरा करायचा आहे. मात्र श्रीलंकेतील करोनाच्या वाढत्या घटनेने भारतीय क्रिकेट बोर्डाच्या संकटात आणखी भर पडली आहे. श्रीलंकेत मंगळवारी केवळ २५६८ करोनाची नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, नवीन प्रकरणांपैकी ३८ लोक परदेशातून आले आहेत. त्यामुळे या दौऱ्यावरही काळे ढग दाटले आहेत.

कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियम भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यात होणाऱ्या सर्व मर्यादित षटकांच्या सामन्यांचे आयोजन करेल. श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) प्रशासकीय समितीचे अध्यक्ष अर्जुन डी सिल्वा म्हणाले, “संपूर्ण मालिका एकाच ठिकाणी घेण्याची आमची योजना आहे. आर प्रेमदासा स्टेडियम या सामन्यांचे आयोजन करणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.”

भारतीय संघ ५ जुलैला श्रीलंका येथे पोहोचेल आणि त्यानंतर एक आठवडा क्वारंटाइन राहील. या कालावधीनंतर दोन्ही संघांमध्ये १३ जुलैपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर २२ जुलैपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येईल.

डी सिल्वा म्हणाले, “अर्थातच त्या वेळी परिस्थिती कशी असेल यावरदेखील हे अवलंबून आहे. करोनामुळे चाहते स्टेडियममध्ये प्रवेश करू शकत नाही, त्यामुळे सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळले जातील.”

धवन-हार्दिक कर्णधारपदाच्या शर्यतीत

भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांच्यापैकी एकाकडे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. जुलै महिन्यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि के. एल. राहुल इंग्लंड दौऱ्यावर असतील. तर श्रेयस अय्यरच्या समावेशाबाबत अद्याप साशंकता आहे. त्यामुळे धवन आणि हार्दिक यांच्यापैकी कोणाची कर्णधारपदी निवड केली जाणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 2:03 pm

Web Title: india tour of sri lanka is in danger due to increasing case of corona in sri lanka adn 96
Next Stories
1 VIDEO : झिम्बाब्वेला हरवल्यानंतर पाकिस्तान संघाने ‘ही’ कृती करत जिंकली सर्वांची मने!
2 ‘‘मी इतका वाईट आहे?”, IPLमध्ये खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे कुलदीप निराश
3 प्रशिक्षण सोडून रोनाल्डो पोहोचला Ferrariच्या मुख्यालयात अन् खरेदी केली सुपरकार!
Just Now!
X