‘‘विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या लढतीत पाकिस्तानचे आव्हान आमच्यापुढे असले तरी आम्ही त्याचे दडपण घेत नाही. कारण आम्ही त्यांच्यावर आशिया स्पर्धेतील अंतिम सामन्यात मात केली आहे,’’ असे भारताच्या युवा (१९ वर्षांखालील) संघाचा कर्णधार विजय झोलने  सांगितले.
‘‘पाकिस्तानविरुद्धचा सामना हा नेहमीच अन्य सामन्यांपेक्षा वेगळा असतो. मात्र आशिया स्पर्धेत आम्ही त्यांना साखळी लढतीत व नंतर अंतिम सामन्यात हरविले असल्यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे,’’ असे झोल म्हणाला.
अबू धाबी येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील साखळी गटात भारताला पाकिस्तान, स्कॉटलंड व पापुआ न्यू गिनी यांच्याशी खेळावे लागणार आहे. भारताचा पाकिस्तानबरोबर १५ फेब्रुवारी रोजी सामना होईल.