20 February 2019

News Flash

ट्वेन्टी-२० मालिकेतही भारत वर्चस्व गाजवण्यास उत्सुक

उभय देशांमधील पाच सामन्यांच्या मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे.

द. आफ्रिकेविरुद्धची पाच सामन्यांची मालिका आजपासून

एकदिवसीय मालिकेतील सवरेत्कृष्ट कामगिरीनंतर भारताचा महिला क्रिकेट संघ ट्वेन्टी-२० मालिकेतही दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी उत्सुक आहे. उभय देशांमधील पाच सामन्यांच्या मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे.

तिसऱ्या लढतीमध्ये सात विकेटनी पराभव पाहावा लागला तरी भारताने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. पहिल्या दोन सामन्यांमध्ये ८८ आणि १७८ धावा असे मोठय़ा फरकाने विजय मिळवले.

एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यशाने हुलकावणी दिली तरी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताच्या संघाने ट्वेन्टी-२० मालिकेमध्ये त्याची कसर भरून काढण्याचा निर्धार केला आहे. चांगला सूर गवसलेली सलामीवीर स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपद आहे. हरमनप्रीत आणि मानधना या दुकलीसह अनुभवी मिताली राज, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, अनुजा पाटील आणि पदार्पण करणारी अष्टपैलू राधा यादव, मुंबईची जेमिमा रॉड्रिग्जवर फलंदाजीची भिस्त आहे. मानधना, दीप्ती आणि वेदाकडून एकदिवसीय मालिकेप्रमाणेच सातत्यपूर्ण फलंदाजी अपेक्षित आहे. अनुभवी झुलन गोस्वामीवर गोलंदाजीची मदार आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिला विश्रांती देण्यात आली होती. झुलनच्या पुनरागमनाने भारताची गोलंदाजी मजबूत झाली आहे. तिला शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, एकता बिश्त आणि पूनम यादवकडून चांगली साथ अपेक्षित आहे.

संघ

  • भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, अनुजा पाटील, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), नुझहत परवीन, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, राधा यादव.
  • दक्षिण आफ्रिका : डेन व्हॅन निकर्क (कर्णधार), मॅरिझेन कॅप, त्रिशा चेट्टी, शबनिम इस्माइल, अयाबोन्गा खाका, मसाबता क्लास, सुन लुइस, ओडिन कर्स्टन, मिग्नन डु प्रीझ, लिझेली ली, क्लोइ ट्रीयॉन, नॅडिन डी क्लेर्क, रेसिबे टोझाखे, मोसेलिन डॅनियल्स.
  • वेळ : सायंकाळी ४.३० वा.

First Published on February 13, 2018 2:21 am

Web Title: india v south africa women t20