ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने हैदराबाद कसोटीच्या तिस-या दिवशी मुरली विजय, महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जडेजा आणि विराट कोहली यांचे बळी घेत ऑस्ट्रेलियचा डाव सावरला. त्याला झेवियर डोहेर्टीची चांगलीच साथ मिळाली, त्याने रविचंद्रन अश्विन आणि हरभजन सिंग यांना माघारी पाठवत भारताच्या धावसंख्येला वेसण घालण्यात यश मिळवले.
अतिशय नाट्यमय मध्दतीने सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर धोनी आणि विरोट कोहली यांनी ५६ धावांची भागीदारी केली. मॅथ्यू वडे याने भुवनेश्वर कुमारचा १० धावांवर बळी घेत भारताचा डाव ५०३ धावांवर समाप्त केला. दु-या डावात भारताकडे २६६ धावांची आघाडी आहे.
हैदराबाद येथे सुरू असलेल्या भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या कसोटी सामन्यामध्ये चेतेश्‍वर पुजाराने कसोटी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक ठोकले आहे. पुजाराने ३० चौकार आणि १ षटकाराच्या मोबदल्यात आपाली द्विशतकी खेळी पूर्ण केली. ग्‍लेन मॅक्‍सवेलच्‍या गोलंदाजीवर चौकार मारून पुजाराने आपले द्विशतक पूर्ण केले. त्यानंतर मात्र, जेम्‍स पॅटिंसनच्‍या चेंडुवर हुकचा फटका मारण्‍याच्‍या प्रयत्‍नात तो बाद झाला. फाईन लेग सीमारेषेजवळ डोहर्तीने त्याचा झेल घेतला.
आज (सोमवार) सकाळी जेव्हा खेळ सुरू झाला तेव्हा मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा या दोघांच्या नाबाद शतकी खेळी आणि दुसऱ्या विकेटसाठी रचलेल्या २९४ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर १ बाद ३११ अशी धावसंख्या आणि ७४ धावांची आघाडी होती. सकाळच्या सत्रात मॅक्सवेलने भारताचा दुसरा बळी घेतला. मुरली विजय १६७ धावांवर बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या २ बाद ३८७ अशी होती. तब्‍बल ३७० धावांच्‍या भागीदारीनंतर ऑस्‍ट्रेलियाला भारताची दुसरी विकेट मिळवण्यात यश आले. उपहारानंतर जेम्‍स पॅटिंसनने सचिन तेंडुलकरला ७ धावांवर बाद केले.
दुपारच्या भोजनानंतर भारताची धावसंख्या ५०३ पर्यंतच पोहचू शकली.