ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ५७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवात निराशाजनक झाली. सलामीवीर मुरली विजय भोपळाही न फोडता माघारी फिरला. त्यानंतर रोहित शर्मा(४०*) आणि लोकेश राहुल(३१*) यांनी संयमी फलंदाजी केली. दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताची धावसंख्या १ बाद ७१ अशी झाली असून टीम इंडिया अजून ५०१ धावांनी पिछाडीवर आहे. तत्पूर्वी, कसोटीच्या दुसऱया दिवशी देखील ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दमदार फलंदाजी करून ७ बाद ५७२ धावाचा रतीब भारतासमोर उभारला.
स्मिथ आणि वॉटसनने तिसऱ्या विकेटसाठी १९६ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला ४०० धावांचा टप्पा पार करून दिला. त्यानंतर शेन वॉटसन ८१ धावांवर मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर, कर्णधार हा स्मिथदेखील ११७ धावांवर उमेश यादवच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाकडे झेल देऊन परतला. मात्र, या दोघांनी तंबूत परतण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला भक्कम स्थितीत नेऊन ठेवले. सध्या शॉन मार्श ७३ आणि बर्न्स ५८ धावांची खेळी साकारून संघाच्या धावसंख्येला ५७२ वर नेऊन ठेवले. फलंदाजांसाठी नंदनवन असलेली खेळपट्टी आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण या गोष्टींचा पुरेपूर फायदा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी उचलत धुमशान घातले. भारतीय गोलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरताना दिसली.
लाइव्ह स्कोअरकार्ड-