भारत आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील पहिला तीन दिवसांचा सराव सामना अनिर्णित सुटला आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया अ च्या फलंदाजीदरम्यान विल पुकोवस्कीला भारताचा युवा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीचा एक चेंडू हेल्मटला लागला. विल पुकोवस्की थोडक्यात बचावला. खेळ थोड्यावर थांबवण्यात आला. त्यानंतर विल पुकोवस्कीला रिटायर्ट हर्ट होऊन माघारी परतला. या प्रसंगाचा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आपल्या ट्विटर पोस्ट केला आहे.

पाहा कार्तिक त्यागीचा बाऊन्सर –

ऑस्ट्रेलियाच्या डावातील तेराव्या षटकातील तिसरा चेंडू कार्तिकने टाकला. बाउंसर पद्धतीचा हा चेंडू अचानक उसळल्याने चेंडू पुकोवस्कीच्या हेल्मेटला लागला. त्याला या घटनेमुळे मैदान सोडावे लागले. विल पुकोवस्कीला चेंडू लागल्यामुळे ड्रेसिंगरुममध्ये परतला. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर अजिंक्य राहणे थेट ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला. अजिंक्य राहणेनं ड्रेसिंग रुममध्ये जाऊन विल पुकोवस्कीच्या प्रकृतीची विचारपूस केली. अजिंक्य रहाणेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात सभ्य खेळाडू का म्हणतात, याचा प्रत्यय त्यानं पुन्हा एकदा दिला.

सराव सामन्यात रहाणेनेच्या या कृत्यमुळे त्यानं असंख्य क्रिकेट चाहत्यांचे मने जिंकली आहेत.