ऑस्ट्रेलियाविरोधातील ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणवेर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अजिंक्य रहाणेचं संयमी नेतृत्व अनेकांना आवडलं असून विराट कोहलीच्या अनुपस्थितीही ज्याप्रकारे संघाला विजय मिळवून दिला त्यावरुन जगभरातून त्याची स्तुती होत आहे. दरम्यान अजिंक्य रहाणेच्या कामगिरीवर त्याचे वडील मधुकर रहाणेदेखील व्यक्त झाले आहेत. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भारताच्या पराभवाचं भाकीत वर्तवणाऱ्या क्लार्क, पाँटिंग, वॉला आनंद महिंद्रांचा टोला; म्हणाले…

“मी सकाळी ९.३० वाजेपर्यंत सामना पाहिला. पण त्यानंतर काम असल्याने मी बाहेर पडलो. प्रवासात असताना भारताने सामना जिंकल्याचे फोन, संदेश येऊ लागले. तेव्हा मनापासून आनंद झाला. आपल्या मुलाचं कर्तृत्व चांगलं लक्षात राहील. भारतासाठी हा आनंदाचा क्षण होता. संघ कठीण परिस्थितीतून जात असतानाही विजय मिळवत देशासाठी अभिमानाचा क्षण मिळवून दिला,” अशा शब्दांत अजिंक्यच्या वडिलांनी संघाचं कौतुक केलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा ३२ वर्षांचा अबाधित विक्रम मोडल्याने मायकल क्लार्क संतापला; म्हणाला…

पुढे ते म्हणाले की, “संघात अनेक मोठे खेळाडू नव्हते, अनेकजण जखमी झाले. काहींनी नुकतंच पदार्पण केलं होतं, तरी खेळाडूंनी जी जिद्द दाखवली त्याचं कौतुक आहे. अशा परिस्थितीतही जिंकल्याचा आनंद आहे,” असं त्यांनी सांगितलं.

“सामना जिंकल्यानंतर अजिंक्यसोबत बोलणं झालं होतं. फक्त एक मिनिट बोलणं झालं होतं. आम्ही एकमेकांचं अभिनंदन केलं. भारतासाठी काहीतरी केल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होता,” असं ते म्हणाले. अजिंक्यच्या स्वभावासंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं की, “तो दिलेलं कार्य करत राहतो. आपल्याला जी जबाबदारी मिळेल ती योग्य प्रकारे पार पाडणं एवढं तो करत असतो”.

ऑस्ट्रेलियन जर्सीत ‘भारत माता की जय’ची घोषणा; हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

विजय साजरा कऱण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, ‘आम्ही असं काही प्लॅन केलेलं नाही. एक दोन दिवस तो घरी असेल. इंग्लंडसोबत सीरिजमुळे तो उपलब्ध नसेल. आमचं सेलिब्रेशन असं काही होत नसतं. घरात फक्त आनंदी वातावरण असत. हे पूर्वीपसून असंच आहे”. “खेळण्याबाबत आम्ही कधी चर्चा करत नाही. नेहमीचं घरचं बोलणं असतं. त्याला कधीच फुकटचे सल्ले दिले नाही. खेळाबद्दल जास्त काही बोलायचं नाही हा नियम आधीपासून ठेवला आहे,” अशी माहिती यावेळी अजिंक्यच्या वडिलांनी दिली.