News Flash

‘त्या’ प्रसंगावर अजिंक्य रहाणेची प्रतिक्रिया, म्हणाला….

अजिंक्यच्या उत्तरानं चाहत्यांची मनं जिंकली

फोटो सौजन्य - AP

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या रहाणेनं पुन्हा एकदा आपल्या शांत आणि संयमी स्वभावाचा परिचय दिला आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बोलताना रहाणेनं रनआऊटवर प्रतिक्रिया दिली. रहाणे म्हणाला की ‘मी धावबाद होतो की नव्हतो..? हा वाद महत्वाचा नाही… मला बाद दिलं हे महत्वाचं आहे. मी या गोष्टीचा फारसा विचारही करत नाही.’ पहिल्या डावात फलंदाजी करताना रहाणे धावबाद झाला होता. तशाच ऑस्ट्रेलियाच्या डावातही टीम पेनविरोधातही धावबादचं अपिल तिसऱ्या पंचानी फेटाळलं होतं. यावरुन ट्विटर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

पेन आणि रहाणे यांच्या रन आऊटचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरुनच रहाणेला प्रश्न विचारला त्यावेळी त्यानं दिलेल्या संयमी उत्तरानं सर्वांची मनं जिंकली आहे. ‘मी धावबाद होतो की नव्हतो..? हा वाद महत्वाचा नाही… मला बाद दिलं हे महत्वाचं आहे. मी या गोष्टीचा फारसा विचारही करत नाही.’ असं रहाणेनं सांगितलं.

यावेळी बोलताना रहाणेनं सांघिक कामगिरीचं कौतुक केलं. शिवाय गोलंदाजींनी आपली भूमिका योग्य पद्धतीनं पार पाडल्याचंही राहणे म्हणाला. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील शतक तुझ्या करीअरमधील सर्वोत्तम शतक आहे का? यावर बोलताना रहाणे म्हणाला की, मेलबर्नवर झळकावलेलं शतक नक्कीचं माझ्यासाठी महत्वाचं आहे. मात्र, लॉर्ड्सच्या मैदानावरील शतक माझ्यासाठी नेहमीच सर्वोत्तम राहिल.

दरम्यान, मेलबर्न कसोटी सामन्यावर भारतीय संघानं आपली पकड बसवली आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने ३२६ धावांपर्यंत मजल मारत १३१ धावांची आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी धाडत तिसऱ्याच दिवशी रंगतदार परिस्थिती निर्माण केली. परंतू कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स यांनी तिसऱ्या दिवसातलं अखेरचं सत्र खेळून काढत कांगारुंना २ धावांची नाममात्र आघाडी मिळवून दिली. दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाचा संघ ६ गडी बाद १३३ धावांपर्यंत मजल मारु शकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 12:58 pm

Web Title: india vs australia ajinkya rahane india tour australia nck 90 2
Next Stories
1 Ind vs Aus : मेलबर्न कसोटीवर भारताचं वर्चस्व, ऑस्ट्रेलिया नाममात्र आघाडी घेण्यात यशस्वी
2 तुमचा तो बाब्या, आमचं ते…; पेन आणि रहाणेसाठी वेगळा नियम, तिसऱ्या पंचांविरोधात चाहत्यांमध्ये नाराजी
3 रहाणेचा मास्टरस्ट्रोक; राहुलऐवजी जाडेजाला खेळवण्याचा डावपेच यशस्वी
Just Now!
X