एम.एस. धोनी आणि विराट कोहली यांच्यानंतर आता विस्फोटक फलंदाज हार्दिक पांड्या पुढील ग्लोबल क्रिकेटर झाल्याचं चित्र आहे. विराट कोहली आणि धोनीच्या फलंदाजांनी अनेकांना वेड लावलं आहे. आता हार्दिक पांड्याची स्फोटक फलंदाजी पाहून अनेकांना त्याचे हेवा वाटत आहे. इंग्लंडची महिला क्रिकेटपटूही हार्दिक पांड्याच्या फलंदाजी फॅन झाली आहे. त्याच्या विस्फोटक खेळीवर ती फिदा झाली आहे.

इंग्लंडची महिला क्रिकेटपटू एलेक्सेंड्रा हार्टली हार्दिकच्या तुफानी फलंदाजी पाहून हैराण झाली. पंड्याच्या धमाकेदार फलंदाजीवर हार्टलीला विश्वास बसला नाही. तिने ट्विटकरून हार्दिकचे कौतुक केले आहे. हार्दिक पंड्या तू खरच हे करून दाखवले आहेस? या ट्विटसोबत तिने काही इमोजी वापरले आहेत. हार्दिकच्या फलंदाजीचा प्रत्येक जण चाहता झाला आहे. विराट कोहलीनंही हार्दिकच्या या नव्या रुपाचं कौतुक केलं आहे.

मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज, मंगळवारी ८ डिसेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात हार्दिक पांड्यानं तुफानी फटकेबाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. गोलंदाजी करत नसल्यामुळे फक्त फलंदाज म्हणून हार्दिक पांड्याला संघात ठेवण्यावर अनेकांनी टीका केली होती. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन एकदिवसीय सामने आणि दोन टी-२० सामन्यात हार्दिकनं आपलं कौशल्य दाखवून दिलं. हार्दिक पांड्या एक परिपक्व फलंदाज झाला आहे. सहाव्या क्रमांकावर भारताकडे हुकमी एक्का असून तो कोणतीही मॅच जिंकून देऊ शकतो, असेही काही दिग्गजांनी म्हटलं आहे.