News Flash

ब्रिस्बेन कसोटीत भारताची आश्वासक सुरूवात ; ऑस्ट्रेलियाचे दोन गडी बाद

भारतीय संघात ४ बदल

ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताची सुरुवात आश्वासक झाली आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारताने पहिल्या काही षटकांत सलामीच्या दोन्ही फलंदाजांना तंबूत धाडलं. मोहम्मद सिराजनं डेव्हिड वॉर्नरला अवघ्या एका धावेवर असताना तंबूत धाडले तर शार्दूल ठाकूरनं पहिल्याच चेंडूवर हँरिसला सुंदरकरवी झेलबाद केलं. दुसऱ्या स्लीपमध्ये असणाऱ्या रोहित शर्मानं डेव्हिड वॉर्नरचा उत्कृष्ट झेल घेतला. सध्या लाबुशेन आणि स्टिव स्मिथनं ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आहे. अवघ्या १७ धावा असताना दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर स्मिथ-लाबुशेन यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. सध्या स्मिथ २९ तर लाबुशेन १९ धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियानं पहिल्या सत्राखेर २७ षटकांनंतर दोन गड्यांच्या मोबदल्यात ६५ धावा केल्या आहेत.

अ‍ॅडलेडच्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाने अनपेक्षित ‘फिनिक्सभरारी’ घेतली. मेलबर्नवरील महाविजय आणि सिडनीमधील संस्मरणीय अनिर्णीत लढतीमुळे मालिकेमध्ये १-१ अशी बरोबरी झाली असून सर्व क्रिकेट जगताचं लक्ष या चौथ्या व शेवटच्या सामन्याकडे लागले आहे.

आणखी वाचा- ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघात ४ बदल; नटराजन, सुंदर यांचं कसोटी पदार्पण

ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटी सामन्यात दुखापग्रस्त जसप्रीत बुमराह आणि आर. अश्विन यांना आराम देण्यात आला आहे. टी. नटराजन आणि वॉशिंगटन सुंदर यांचं कसोटी पदार्पण झालं आहे. त्याशिवाय मयांक अगरवाल आणि मुंबईकर शार्दुल ठाकूरलाही संधी देण्यात आली आहे. अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे ‘अ’ संघाप्रमाणे भासणाऱ्या भारताची ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी लागणार आहे.

असा आहे भारतीय संघ – अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, ऋषभ पंत(यष्टीरक्षक), नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर

ऑस्ट्रेलिया (११ जण) : टिम पेन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लबूशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 7:16 am

Web Title: india vs australia australia are batting first in 4th test india tour australia nck 90
Next Stories
1 ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघात ४ बदल; नटराजन, सुंदर यांचं कसोटी पदार्पण
2 अखेरची झुंज!
3 सायनासह भारताचे आव्हान संपुष्टात
Just Now!
X